पत्रकार शफी इमडे काळाच्या पडद्याआड त्यांचे अपघाती निधन

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

पत्रकार शफी इमडे काळाच्या पडद्याआड त्यांचे अपघाती निधन

मुरूम, ता.०२ (प्रतिनिधी) : येथील यशवंत नगर भागात राहणारे शफी इमडे यांनी दैनिक केसरी, सोलापूर या वर्तपत्रात सन १९९७ पासून त्यानंतर दै.गावकरी या वर्तपत्राच्या माध्यमातून १२ वर्ष पत्रकार म्हणून सुरवातीला काम केले. त्यानंतर सन २००९ पासून दैनिक सकाळचे मुरूम शहर प्रतिनिधी म्हणून गेल्या ११ वर्षापासून बातमीदारी करत होते. त्यांचा २३ वर्षाच्या अनुभवामुळे त्यांनी सामाजिक बांधीलकीचे भान राखून लेखणीच्या माध्यमातून या परिसरातील सर्व सामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडली. पत्रकार शफी इमडे यांचे अपघाती निधन मंगळवार (ता.१) रोजी झाले. ते लोहारा येथे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी गेले होते. मुरुमकडे येत असताना पांढरी गावा नजीक त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते अतिशय मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभाव असल्याने मुरूम परीसरात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अकस्मात जाण्याने मुरूम पत्रकार संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काल दिवसभर शहरात शोककळा पसरली होती. विविध सामाजिक संस्था, संघटना व मित्रांनी त्यांना समाज माध्यमावर श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या वरती रात्रीच मुस्लीम कब्रस्थानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार भाऊ, दोन बहीणी, तीन मुली असा परिवार आहे.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment