खरिपाच्या पेरणीसाठी घरगुती बियाणे शिल्लक ठेवा – आमदार ज्ञानराज चौगुले यांचे आव्हान

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

खरिपाच्या पेरणीसाठी घरगुती बियाणे शिल्लक ठेवा – आमदार ज्ञानराज चौगुले यांचे आव्हान

खरीप हंगाम २०२१ करीत सोयाबीन ग्रामबिजोत्पादन मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी आज आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कृषि विभाग व शेतकरी आत्मा बचत गटांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये असणारे सोयाबीन भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे सध्या मार्केट मध्ये येणाऱ्या सोयाबीनचा भाव तेजीत आहे. जास्त भाव मिळत असल्यामुळे शेतकरी स्वतःकडील सर्व सोयाबीन मार्केटमध्ये विकून टाकण्याची शक्यता आहे. परंतु सध्याचे सोयाबीनचे वाढते भाव पाहता बियाण्याचा भाव सुद्धा जास्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही

यामुळे ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन चांगले / न भिजलेले आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन पुढील खरीप हंगामात बियाणे म्हणून वापरण्यासाठी जपून ठेवावे, तसेच पेरणीपूर्व बियाण्यांची उगवण शक्ती तपासून आणि बीजप्रक्रिया करून पेरणी करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा बियाण्यांवरील अतिरिक्त खर्च कमी होईल असे आवाहन आमदार ज्ञानराज चौगुले व धाराशिव जिल्ह्याचे युवानेते किरण गायकवाड यांनी शेतकऱ्यांना केले.

सदर बैठकीत तालुका कृषी अधिकारी सुनीलकुमार जाधव यांनी खरीप हंगाम २०२१ साठी बियाण्यांची गरज व खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये सोयाबीन बीजोत्पादन मोहिमेअंतर्गत उत्पादित सोयाबीन बियाण्यांची माहिती दिली. तसेच मंडळ कृषी अधिकारी शाम खंडागळे यांनी सोयाबीन बियांची साठवणूक व पेरणीपूर्व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली.

बैठकीस तहसीलदार संजय पवार, तालुका कृषी अधिकारी सुनीलकुमार जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, मुरूम मंडळ कृषी अधीकारी श्याम खंडागळे, शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी शैलेश माळगे, शेतकरी गटातील शेतकरी, प्रगतीशील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment