मुरूम शहरात कोरोनाचे संसर्ग रोखण्यासाठी “माझे कुटुंब,माझी जबाबदारी” अभियानास सुरुवात
नगर परिषद व ग्रामीण रुग्णालयाचे वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी
मुरूम ता. २४, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभर कोरोनाचे संसर्ग रोखण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या अभियानास सुरुवात झाली आहे.
या अभियानांतर्गत राज्यातील नागरिकांचे घरोघरी जाऊन त्यांच्या आरोग्याची थर्मल स्कॅनिंग आणि ऑक्सिमिटरने तपासणी करण्यात येणार असून मुरूम शहरात नगर परिषद व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने अभियानास सुरुवात करण्यात आले आहे.
शहर हद्दीतील एकूण आठ प्रभागामध्ये स्वतंत्र पथक नेमून कुटुंबातील व्यक्तीचे आरोग्य सर्वेक्षण दि. १७ सप्टेंबर पासून हाती घेतले असून या सर्वेक्षणा दरम्यान प्रत्येक व्यक्तीचे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तसेच तापमान तपासणी करण्यात येत आहे. तसेच कुटुंबातील व्यक्तीला इतर आजार किंवा कोरोनासदृश्य आजार असल्यास त्यांना उपचारासाठी रुग्णालयाकडे जाण्यासाठी सूचना देण्यात येत आहे.
आता पर्यंत या सर्वेक्षणादरम्यान ७५० कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षण पथकामध्ये नगर परिषद कर्मचारी व आरोग्य विभाग कर्मचारी यांचा समावेश आहे. सदरील सर्वेक्षणाचे दोन टप्प्यात विभागणी केली असून दि. १० ऑक्टोबर पर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा सर्वेक्षण चालू असून दुसरा टप्पा दि.२५ ऑक्टोबर पर्यंत असल्याचे माहिती मुरूम नगर परिषदचे कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे यांनी दिली आहे.
Leave A Comment