महादेव कांबळे यांचा प्रामाणिकपणा, दोन तोळ्याचे सोन केलं परत

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

महादेव कांबळे यांचा प्रामाणिकपणा, दोन तोळ्याचे सोन केलं परत

५ हजार रुपयांचा बक्षीस, मुरूम पोलिसांची यशस्वी कामगिरी….

मुरूम ता.२६, प्रामाणिकपणा हा गुण बोलून दाखवणे खूप सोप्पे आहे परंतु प्रामाणिक राहणे खूप अवघड आहे. प्रामाणिकपणा अंगी येण्यासाठी एक आंतरिक दृष्टी विकसित करावी लागते. तेव्हा आपण बोलणे, वागणे, नातेसंबंध, मैत्री, प्रेम अशा जीवनाच्या प्रत्येक पैलूत प्रामाणिक राहू शकतो. असाच एक प्रामाणिकपणाच प्रत्यय मुरूम पोलीस स्टेशन हद्दीतील येनेगुर येथील महादेव कांबळे यांनी दाखविली आहे, मुरूम येथील रहिवासी भारत मेडिकलचे मालक शिवानंद मूदकण्णा दि.२२ रोजी येनेगुर येथे विवाह सोहळ्यासाठी गेले असता त्यांचे दोन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट हरवले होते, दोन दिवस शोधून ही त्यांना ब्रेसलेट मिळत नसल्याने ते दि.२४ रोजी मुरूम पोलिसात तक्रार दाखल केली होती, संबधीत घटना मुरूम स्टेशन अंतर्गत असणाऱ्या येनेगुर पोलीस स्टेशन येथील बिट सह्ययक पोलीस फौजदार संजय शिंदे यांनी मुरूम पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक एम जी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात करणार इतक्यातच प्रामाणिक महादेव कांबळे पोलीस स्टेशन गाटले आणि त्यांना सापडलेलं दोन तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट पोलिसांना सुपूर्द केले, दि.२६ रोजी मुरूम पोलीस स्टेशन येथे महादेव कांबळे यांचे सपोनि शेंडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तर शिवा मूदकण्णा यांनी त्यांना रोख रक्कम ५०००/- रु बक्षीस स्वरूपात दिले.कांबळे यांनी दीखविलेलं प्रामाणिकपणा आजही मुरूम शहर व परिसरात माणुसकी जिवंत असल्याचे प्रत्यय दर्शविते…

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment