काका चषक क्रिकेट स्पर्धेत महात्मा बसवेश्वर संघाने मिळवले विजेतेपद
अंतिम स्पर्धेचे शरण पाटील यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
मुरूम/ प्रतिनिधी
मुरूम येथे २१ जानेवारी पासून शरणजी पाटील मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या खुल्या टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धेत एकशे दहा संघाने सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सोलापूर, लातूर, उस्मानाबाद तर कर्नाटक राज्यातील बिदर, गुलबर्गा या जिल्ह्यातील संघाने सहभाग नोंदवला.
काका चषक अंतिम सामना (दि.२८ ) रविवारी महात्मा बसवेश्वर संघ,मुरूम व सेव्हन स्टार भुसनी या दोन संघात अटीतटीचा सामना झाला,या सामन्यात महात्मा बसवेश्वर संघाने विजय मिळवला. तर सेवन स्टार क्रिकेट संघ भुसणी वाडीला दुसऱ्या क्रमांकावर संतुष्ट मानावे लागले, तर तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आर सी सी क्रिकेट संघ मुरूमने पटकावले या तिन्ही संघाला शरणजी पाटील मित्रमंडळा च्या वतीने प्रथम पारितोषिक एक लाख रुपये रोख व चषक व द्वितीय पारितोषिक डॉ.विशाल रमेश पवार यांच्या कडून एक्कावन हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक उमरगा पं. स.सभापती सचिन पाटील यांच्या वतीने एकतीस हजार रुपये रोख व चषक ,अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार प्राचार्य प्रवीण गायकवाड यांच्याकडून पाच हजार रु रोख व चषक व यासह इतर वयक्तिक बक्षिसे जि. प.विरोधी पक्षनेते शरण बसवराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी ऍड. नानासाहेब पाटील,पं. स.उमरगा सभापती सचिन पाटील ,प्रशांत पाटील ,जि. प.सदस्य रफिक तांबोळी,नगराध्यक्ष अनिताताई अंबर नगरसेवक रशीद गुत्तेदार,श्रीकांत बेंडकाळे, उमरगा नगरसेवक महेश माशाळकर, महालिंग बाबशेट्टी, बबन बनसोडे,सुधीर चव्हाण,गौस शेख,गोविंद कौलकर आदी उपस्थित होते.पंच म्हणून गुलाब आडके, बसवराज आडके तर समालोचन किरण गायकवाड ,अमोल बनसोडे,पंडित मुदकन्ना यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल वाघ,ओंकार पाटील, देवराज संगुळगे,सूरज कांबळे,सचिन उर्फ झुंबर बनसोडे, राजू मुल्ला, उत्कर्ष गायकवाड,गौरीशंकर बोंगरगे, शिवा दुर्गे, श्रीहरी पाटील, जिंदावली संण्णाटे, ईश्वर कडगंचे, अभि कुलकर्णी,प्रणीत गायकवाड,प्रशांत मुरूमकर, सागर खुणे आदींनी परिश्रम घेतले. अंतिम सामना पाहण्यासाठी जवळपास ८ ते १० हजार प्रेक्षक उपस्थित होते तर थेट प्रक्षेपणच्या युट्युब व फेसबुक च्या माध्यमातून २० हजार क्रिकेटप्रेमीनी सामन्याचा आनंद घेतला.
Leave A Comment