महात्मा बसवेश्वरांनी सर्व प्रथम स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून दिला- मुरुगेंद्र मठ शास्त्री

0
(0)

महात्मा बसवेश्वरांनी सर्व प्रथम स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून दिले- मुरुगेंद्र मठ शास्त्री

मुरूम येथील कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात बसव पुराणास प्रारंभ

मुरूम ता.१७, येथील ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त श्रावणमास मध्ये काशी,उजैन,श्रीशैल पिठाचे संचालक बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी पुराणाचे आयोजन करण्यात येते त्याअनुषंगाने दि.१७ वार गुरुवार रोजी मुरूम येथील हनुमान चौकातील श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन प्रांगणात श्री बसव पुराण कथेला प्रारंभ झाले. मुरूम येथील नारळी मठाचे मठादिपती जय मल्लिकार्जुन स्वामी, चरमूर्ती मठाचे शिव बसव स्वामी यांच्या शुभहस्ते श्री बसव पुराण कथेचे उदघाटन संपन्न झाले. याप्रसंगी उमराणी मठाचे वेद मूर्ती मुरुगेंद्र मठ शास्त्री म्हास्वामी यांच्या मधुर वाणीने श्री बसव पुराण कथेला प्रारंभ झाले. यावेळी बोलताना चूल आणि मूल मध्ये होरपळत असलेल्या स्त्रियांना सर्व प्रथम स्वातंत्र्य जगतज्योति महात्मा बसवेश्वरांनी मिळवून दिले असे मत शास्त्री यांनी व्यक्त करत कथेस सुरुवात झाले. चार भिंतीमध्येच आपले जीवन व्यतीत करणाऱ्या स्त्रियांना जनमानसात वावरता यावे आपले मत मांडता यावे यासाठी महात्मा बसवेश्वरांनी बहीण नागाई यांना सर्व प्रथम लिंग दीक्षा देऊन स्त्री जीवन स्वातंत्र्यास प्रारंभ केले असल्याचेही ते म्हणाले.यावेळी पुराणाच्या पहिल्याच्या दिवशी असंख्य महिला सदभक्तांची उपस्थिति होती. मुरूम येथे दि.१७ ऑगस्ट पासून ते दि.१३ सप्टेंबर २०२३ पर्यंत श्री बसव पुराण या पवित्र पुराणाचे प्रवचन सायंकाळी ४ ते ७ यावेळेत संपन्न होणार असून मुरूम शहर व परिसरातील सदभक्तांनी लाभ घेण्याचे अवहान मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •