मराठा आरक्षण- मुरूम शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, कडकडीत बंद….

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

मराठा आरक्षण- मुरूम शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, कडकडीत बंद….

मुरूम ता.१४, जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा दि.१० तारखेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर दि.१४ वार बुधवार रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती,

त्याअनुषंगाने उमरगा तालुक्यातील मुरूम येथील सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने दि.१३ रोजी मुरूम पोलीस स्टेशनला मुरूम शहर बंद बाबत निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि.१४ वार बुधवार रोजी मुरूम शहरातील मुख्य बाजारपेठेत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुरूम व्यापारी संघाच्या वतीने मराठा समाजाच्या बंदच्या हाकेला पाठिंबा दर्शवित संपूर्ण मुरूम शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment