मराठा समाज शांत बसणार नाही : छत्रपती संभाजीराजे
तुळजापूर : महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ५८ शांत मोर्चे निघाले. राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अनेकदा निवेदन आंदोलने मोर्चे काढून सातत्याने याविषयी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मराठा समाज हा आज आर्थिक सक्षम नसल्यामुळे आणि शैक्षणिक आरक्षण मिळावे, यासाठी रस्त्यावर उतरून सरकारकडे न्याय मागतो आहे. परंतु, मागच्या सरकारने कायद्याच्या चौकटीत बसून दिलेले १३ टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली असल्याने मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. यापुढे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही किंवा आरक्षणावर स्थगिती हटत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. मराठा बांधव आता यापुढे शांत राहणार नसल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले.
तुळजाई नगरीतील मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, ‘तुळजाई नगरी तुळजाभवानी माता ही कायमच मराठ्यांची ऊर्जादायी आहेत. त्यामुळेच सर्वच विधी असो वा कार्यक्रम आई भवानीच्या आशीर्वादाने करत असतो. केंद्र सरकार असो वा राज्य सरकार त्यांनी तात्काळ मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा मराठा बांधव मी स्वतः हा अन्याय सहन करणार नाही. त्यामुळे भविष्यात जोपर्यंत आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार मराठा बांधव शांत आहे. याचा अर्थ भविष्यात काहीच करणार नाही असा नाही. त्यामुळे आमच्या संयमाची परीक्षा न घेता मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री यांच्यासह केंद्र सरकारने ही मराठ्यांना न्याय देण्यासाठी पावले उचलावीत, अन्यथा ठोक मोर्चा चे पाऊल या पुढे संयमी नसणार असाही इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिला.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावण नगरीत सरकारच्या विरोधात महाजागर सकल मराठा समाजाचा वतीने मराठा आरक्षण आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वास शुक्रवारी दुपारी बाराच्या दरम्यान शिवाजी महाराज चौका, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजी राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, मल्हार, राणाजगजितसिंह पाटील, सचिन रोचकरी, विशाल रोचकरी, अभिजित कदम सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन केले. तुळजाभवानी मातेच्या दरबारात शहाजीराजे महाद्वार समोर सरकारच्या विरोधात महाजागर कार्यक्रम करण्यात आला. यावेळी शहाजीराजे महाद्वार परिसरातसह भवानी रोड सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले होते. या सरकारच्या विरोधात महाजागर कार्यक्रमास लातूर, वागदरी, उस्मानाबाद, सोलापूर, उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव, बावी, कावलदरासह तुळजापूर तालुक्यात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना शिवाजी चौकात, आंबेडकर चौकात, शहाजीराजे महाद्वाराच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून शहाजीराजे महाद्वाराकडे जाणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आंबेडकर चौकात सर्व सकल मराठाच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचे सर्व नियम, अटी नियमाचे पालन करण्यात आले.
Leave A Comment