मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा होणार, पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा होणार,
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण

उस्मानाबाद,दि.15(जिमाका):- उस्मानाबाद शहर व जिल्हयामध्ये कोविडचे रुग्ण संख्या वेगाने वाढत असल्याने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने दिनांक 17 सप्टेंबर रोजीचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ध्वजारोहण कार्यक्रमाशी निगडीत कर्मचारी अधिकारी व पोलीस अधिकारी यांना प्रवेश निश्चीत करण्यात आला आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. या व्यतिरिक्त केंद्र शासनाच्या निर्देशनुसार कोरोनाचा संसर्ग होवू नये त्याअुनषंगाने सोशल डिस्टींग अनुपालन करण्याच्या अनुषंगाने 50 व्यक्तींना ध्वजारोहण कार्यक्रम साठी प्रवेश निश्चीत करण्याचे ठरले आहे. तसेच शासन निर्णय सामन्य प्रशासन 14 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार उस्मानाबाद जिल्हयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते दि.17 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 8.45 वाजता स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम. व 9.00 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी मुख्य शासकीय कार्यक्रमाचे ध्वजारोहण प्रातअधिकारी/तहसिलदार यांच्या हस्ते होण्याचे आदेश आहेत.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर 60 वर्षावरील ज्येष्ठ स्वातंत्रय सैनिक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी नम्र आवाहन करण्यात येते की कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घरी बसूनच मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. तसेच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दार जवळ थर्मामिटर व पल्स ऑक्सीमीटरच्या सहायाने तपासणी करण्यात येणार आहे, असे ही प्रशासनाने कळविले आहे.

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment