आमदार चौगुले यांच्या बदललेल्या वागणुकीमुळे भाजपात प्रवेश- चंद्रशेखर मूदकण्णा-पाटील, माजी उपतालुका प्रमुख शिवसेना
मुरूम ता.०४, येथील माजी नगरसेवक तथा शिवसेना तालुका उपप्रमुख चंद्रशेखर मूदकण्णा पाटील यांनी दि.०३ रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील यांच्या हस्ते, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा व्यापारी आघाडीचे श्रीकांत उर्फ राजू मिनियार, अनदूरचे दीपक आलूरे, सास्तुरचे राहुल पाटील सह शेकडो कार्यकर्त्या सह तुळजापूर येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केले, तत्पुर्वी मुरूम येथील अक्कलरोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, अशोक चौका पर्यंत पद यात्रा काढून व त्यानंतर वहाणातून संपर्ण मुरूम शहरास वाजत गाजत प्रदक्षिणा घालून पक्ष प्रवेश करीत असले बाबत शक्ती प्रदर्शन करीत तुळजापूर येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास २० ते २५ गाड्याचा ताफा सहित उपस्थिती दर्शवून चंद्रकात दादा पाटील यांच्या हस्ते भाजपा पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेने कडून ०४ वेळा नगरसेवक पद आणि गेले १५ वर्षे उपतालुका प्रमुख पद भूषविलेल्या पाटलांनी पक्ष संकट काळात भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केले, याबाबत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली, यावेळी पाटील म्हणाले २८ वर्षे शिवसेनेचे आम्ही सेवा केली, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वागणुकीवर नाराज होऊन आम्ही शिवसेना पक्ष सोडत आहोत, मुरूम व परिसरात आमदारांनी कसल्याही प्रकारची निधीची उपलब्धता करून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, आमचे ध्येय समाजकार्याची आहे आम्हाला पक्षाकडून कुठलीही अपेक्षा नाही आजही आमच्या मनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या बद्दल अस्मिता आहे, आमदार चौगुले यांचा कार्यकर्त्या बाबत किंवा सामाजिक कार्याबाबत कसलीच सहकार्य त्यांच्या कडून मिळत नसल्याने आम्ही शिवसेना पक्ष सोडत असून, याही पुढील काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे समाजकार्य चालू ठेऊ आणि मुरूम व परिसरात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू असे मत चंद्रशेखर मुदकण्णा-पाटील यांनी व्यक्त केले, कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने भाजपाचे काम करावे असे अवहानही पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
Leave A Comment