ऊसबिलासाठी मनसेची साखर आयुक्तांकडे धाव पाच महिने होऊनही शेतकऱ्यांना बिल दिले नाही अन्यथा खळखटयाळ

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

ऊसबिलासाठी मनसेची साखर आयुक्तांकडे धाव

पाच महिने होऊनही शेतकऱ्यांना बिल दिले नाही

अन्यथा खळखटयाळ

उमरगा-लोहारा
ता.०५, मागील वर्षी लोकमंगल कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपी नुसार ऊसबिलाची रक्कम दिलेली नाही. एकाच हंगामात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या रकमेत हप्ता दिलेला आहे. तोही वेळेत दिलेला नाही. एफआरपी अधिक १५ टक्के व्याजासह संपूर्ण ऊसबिल द्यावे अन्यथा खळखटयाळ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

साखर आयुक्त पुणे यांना लोहारा तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये लोहारा तालुक्यातील खेड येथील लोकमंगल माऊली कारखान्याला अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी दिला होता. सदरील कारखान्याने सुरुवातीला प्रति मेटन दोन हजार १०० रुपये, तर काही शेतकऱ्यांना १ हजार रुपये प्रमाणे ऊस बिल अदा केलेले आहे. एकाच सिझनमध्ये वेगवेगळे दर दिल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आणलेनंतर १४ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसबिल जमा करणे बंधनकारक आहे. परंतु लोकमंगल कारखान्याने जानेवारी व फेब्रुवारी २०२१ चे ऊसबिल पाच महिने उलटुनही अद्याप दिलेले नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची अत्यंत गरज आहे. आर्थिक अडचणींमुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. खरीपाचे खत व बियाणे खरेदीसाठी सावकाराचे उंबरठे झिझवावे लागत आहेत. यातच एकाच सिझनमध्ये वेगवेगळे दर दिल्याने शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. लोकमंगल माऊली साखर कारखान्याचे संपूर्ण एफआरपी अधिक विलंबाच्या कालावधीसाठी १५ टक्के व्याजासह ऊसबिल अदा करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खळखटयाळ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मनसेचे लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव यांची सही आहे.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment