शेतकरी विरोधातील कायद्याच्या विरोधात मुरूम शहर कडकडीत बंद….महाविकास आघाडी,शेतकरी बांधव,सामाजिक संघटनेचा बंद मध्ये सहभाग

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

शेतकरी विरोधातील कायद्याच्या विरोधात मुरूम शहर कडकडीत बंद….

महाविकास आघाडी,शेतकरी बांधव,सामाजिक संघटनेचा बंद मध्ये सहभाग

मुरूम ता.०८, दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंद पुकारण्यात आले आहे, त्याला मुरूम शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला, मुरूम शहरातील महाविकास आघाडी,शेतकरी बांधव, सामाजिक संघटना व समविचारी पक्षाच्या वतीने शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या मुरूम शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बैलगाडी, ट्रॅक्टर, मळणी यंत्र सह महाविकास आघाडी,सामाजिक संघटना,शेतकरी बांधव पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रॅली काडून जय जवान जय किसान चा नारा देत किसान आक्रोश आंदोलन संपूर्ण मुरूम शहरातून कायदे विषयी माहिती देत जनजागृती करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज चौक,महात्मा बसवेश्वर चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक,अशोक चौक,टिळक चौक,किसान चौक,सुभाष चौक,गांधी चौक,हनुमान गल्ली तुन किसान आक्रोश आंदोलन रॅली काढण्यात आली व महात्मा बसवेश्वर चौक मुरूम येथे पोलीस प्रशासनास निवेदन देऊन रॅलीचे सांगता झाले.

नवीन कृषी कायदा म्हणजे रोगापेक्षा इलाज अधिक जालीम अशी गत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बाजार समिती व्यवस्थेत योग्य त्या सुधारणा होण्याची, या व्यवस्थेला मजबूत, सक्षम करण्याची त्याची व्याप्ती वाढवण्याची आणि त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्यांचा उपयोग करून घेण्याची गरज आहे. खासगी व्यापारी कंपन्यांचा वावर, हस्तक्षेप आणि अधिकार वाढवून कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचे नाही असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

किसान आक्रोश आंदोलनात जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण बसवराज पाटील यांनीही सहभाग नोंदवून आपले मत मांडले व त्याच बरोबर मोहन जाधव,सरकार भीमराज ग्रुपचे अध्यक्ष आनंद कांबळे, युवासेना मुरूम व सर्कल प्रमुख भगत माळी, किरण गायकवाड आदींनी रॅली दरम्यान शेतकरी विरोधातील कायद्या संदर्भात माहिती दिली.

या आंदोलनात मुरूम शहर उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, रशीद शेख गुत्तेदार काँग्रेस आय मुरूम शहर अध्यक्ष सुधीर चव्हाण, आयुब मासुलदार,राजू मुल्ला, युवक काँग्रेस अध्यक्ष गौस शेख, प्रशांत मुरूमकर,संजय सावंत,श्रीधर इंगळे,नाना बेंडकाळे,शंभूलिंग पाटील,देवराज संगुळगे,राहुल वाघ यासह शेतकरी बांधव, पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment