ग्रामदैवत श्री कपिलेश्वर यात्रा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समितीचा निर्णय
मुरूम, ता. १२ (बातमीदार) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९७२ पासून चालत आलेली परंपरागत मुरूम ग्रामदैवत श्री कपिलेश्वर यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे सर्वानुमते ठराव घेऊन सोमवारी (ता.१०) रोजी समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. १९७२ पासून या मंदिराला एक वैभवशाली परंपरा आहे. दरवर्षी श्री कपिलेश्वर यात्रा अत्यंत भव्य-दिव्य सोहळ्यात संपन्न केली जाते. सर्व धर्मीय हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे व वाढत्या प्रार्दूभावामुळे या वर्षीच्या १७ ऑगस्ट सोमवारी रोजी होणारी श्री कपिलेश्वर यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे. तसेच घरातूनच श्री कपिलेश्वर यांचे प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून घरात राहूनच यात्रा साजरी करून स्थानिक प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी मंदिर समितीच्या वतीने भक्तगणांना करण्यात आले आहे. सध्या मंदिर गाभाऱ्यात व मंदिराचे
शुशोभिकरण व रंगरगोटीचे काम चालू असून देणगी देऊ इच्छिणाऱ्या सदभक्तांनी मंदिर समितीकडे देणगी देऊन रितसर पावती घेण्याचे आवाहन यावेळी मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.
Leave A Comment