राष्ट्रीय लोकन्यायालयात उस्मानाबाद जिल्ह्यातील ९६७ प्रकरणे निकाली

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

राष्ट्रीय लोकन्यायालयात उस्मानाबाद जिल्ह्यातील ९६७ प्रकरणे निकाली

उस्मानाबाद, दि. १३ : मा. श्रीमती एस. एम. शिंदे मॅडम, प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे मार्गदर्शनाखाली लोकन्यायालयाचे कामकाज सुरू झाले. त्यावेळी मुख्यालयातील न्यायिक अधिकारी, रूपाली आवले- डंबे, अतिरिक्त जिल्हाधिकारी उस्मानाबाद, चारुशिला देशमुख, समन्वय भूसंपादन अधिकारी, श्री. एम. एस. पाटील, महाराष्ट्र व गोवा विधीज्ञ परिषदेचे सदस्य, श्री. आर. एस. बोधले, अध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद, श्री. योगेश खरमाटे, प्रांताधिकारी उस्मानाबाद, प्राध्यापक श्री. संजय आंबेकर, जिल्हा सरकारी वकील, विधिज्ञ मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज रोजी चे राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी व फौजदारी अपील, भूसंपादन प्रकरणे, बँक व वित्तीय संस्थांची वसुलीची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ अन्वयेचे धनादेश अनादरीत झालेली प्रकरणे व फौजदारी पात्र तडजोड प्रकरणे ठेवण्यात आली होती. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये उस्मानाबाद जिल्हयामधून प्रलंबित ३१७० एवढी तर न्यायालयात दाखल न झालेली ३३५३ ऐवढी वाद दाखल पूर्व प्रकरणे अशी एकूण ६५२३ एवढी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी न्यायालयात दाखल असलेले प्रलंबित ७६८ एवढे प्रकरणे तर वाद दाखल पूर्व १९९ ऐवढी प्रकरणी असे एकूण ९६७ प्रकरणे, ९,५६, ३१०४८/- ऐवढया रकमेची प्रकरणे सामंजस्याने न्यायालयात निकाली निघाली. लोक न्यायालय यशस्वी होण्याकरिता जिल्हा व तालुका न्यायालयातील न्यायिक अधिकारी, पॅनल प्रमुख, पॅनल सदस्य, जिल्हा विधिज्ञ तालुका विधीज्ञ मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार बंधू-भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले अशी माहिती *श्री. एस. बी. तोडकर*, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी दिली. दि.१२/१२/२०२० रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या कालावधीमध्ये मा. श्रीमती एस. एम. शिंदे मॅडम, प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद, यांचे मार्गदर्शनाखाली विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी व पॅनल विधीज्ञ यांचे करीता विधी साक्षरता शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये श्री. एस. बी. तोडकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी उपस्थितांना विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, १९८७ व विधी सेवा प्राधिकरण (लोक न्यायालय) रेगुलेशन्स २००९ मधील लोकन्यायाल, त्याचे आयोजन, रचना, कोणते प्रकरणे ठेवता येतात, कामकाज कसे चालते, निवाडयाची अंमलबजावणी कशी होते, लोकन्यायालयाची माहिती कोठे मिळते, लोकन्यायालयाचे फायदे या बाद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. ए. एम. पाटणकर, ३ रे सहदिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर यांनी व श्री. आर. एस. बोधले, अध्यक्ष, जिल्हा विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद यांनी मानवाधिकार दिनानिमित्त उपस्थितांना मानवाधिकाराचे सविस्तर मार्गदर्शन केले. लक्ष्मी कोरे या विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थीने उपस्थितांचे आभार मानले.

 

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment