राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांचे निधन

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांचे निधन

पुणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेडा विधानसभेचे आमदार भारत भारत नाना भालके यांचे शुक्रवारी ता.२७ रोजी निधन झाले त्यांचे वय ६० होते.

आमदार भालके यांना ३० ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती,त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुबी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर कोरोनातून बरे होऊन घरी आल्यानंतर काही दिवसांनी त्यांची तब्येत परत बिघडली. शुक्रवारी त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सह अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

मात्र शुक्रवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शनिवारी ता.२८ रोजी सकाळी पंढरपूर येथील सरकोली या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात्य पत्नी,मुलगा,तीन विवाहित मुली असा परिवार आहे.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment