एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत शहरात पोषण अभियान संपन्न…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत शहरात पोषण अभियान संपन्न…

मुरूम ता.१५, येथील यशवंत नगर भागात एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्प उस्मानाबाद अंतर्गत पोषण माह निमित्त पोषण अभियान संपन्न झाले.

दि.१ ते ३० सप्टेंबर हे पोषण महिना म्हणून सर्वत्र साजरे केले जाते, याचेच औचित्य साधून मुरूम शहरातील यशवंत नगर,शास्त्री नगर,महादेव नगर,नेहरू नगर,भीमनगर,धनगर गल्ली,सैदा-जेवळे गल्ली या ०१ ते ०७ क्रमांकाच्या अंगणवाडीच्या वतीने यशवंत नगर येथे पोषण अभियान संपन्न झाले. या अभियानात गणेशोत्सव मंडळामध्ये पोषण आहारावर घोष वाक्य,माझी कन्या भाग्यश्री,मातृवंदना योजना,सुकन्या योजना याविषयी फलक लावण्यात आले होते. गरोदर व स्तनदा माता यांच्या करीता पौष्टिक आहार बाबतचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.सॅम-मॅम म्हणजेच उंची,वजन कमी असलेल्या बालकाकरिता पौष्टिक पाककृती करून दाखवणे व तसेच आरोग्य विषयी मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी साठी जे पदार्थ येते त्या उपलब्ध साधन सामुग्रीतुन पौष्टिक पाककृती प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले त्याच बरोबर ओला कचरा,सुका कचरा व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानासाठी अंगणवाडीसेविका माने मनीषा,समुद्रे माधुरी,सराटे रेखा,तनवीर उडचने,स्नेहल गोडबोले,भाग्यश्री घोडके, शाहीन अत्तार यासह मदतनीस भाग्यश्री पन्हाळे,रुबिना शेख,रेश्मा कांबळे,वंदना बन्ने आदींनी परिश्रम घेतले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment