डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त मुरूम शहरात मॅरेथॉनचे आयोजन

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त मुरूम शहरात मॅरेथॉनचे आयोजन

पोलीस उपायुक्त सागर यांच्या संकल्पनेतून मुरूम शहरात पहिल्यांदाच मिनी मॅरेथॉन २०२२ चे आयोजन

मुरूम ता.२८, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुरूम शहरात पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या संकल्पनेतुन मिनी मॅरेथॉन २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१७ एप्रिल रोजी स्पर्धा पार पडणार असून दि.०५ एप्रिल पर्यंत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे.
३ किलोमीटरच्या स्पर्धेसाठी अ वर्गासाठी वय वर्षे १२ ते १५ वयोगटातील व ब वर्गात ४५ वरील सर्वांसाठी व तसेच महिलांसाठी तर ५ किलोमीटरच्या स्पर्धेसाठी सर्वांसाठी खुला ठेवण्यात आले असून जास्तीत नागरिकांनी मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले असून, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किरण गायकवाड,सिद्धांत गायकवाड,प्रशांत मुरूमकर,देवराज संगुळगे,शरणप्पा वाडे,आनंद कांबळे,जिंदावली सन्नाटे, विकी चव्हाण,अतुल सावंत,आशुतोष गायकवाड यांच्याकडे नावे नोंदविण्यात यावे असे आवाहन ही यावेळी करण्यात आले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निशुल्क नोंदणी चालू आहे, मुरूम व परिसरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन मिनी मॅरेथॉन २०२२ स्पर्धा यशस्वी करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी केली आहे.विजेत्यांना मेडल,प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे व त्याच बरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे अधिकृत माहिती आयोजकांनी दिली आहे.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment