गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शांतता कमिटीचे बैठक संपन्न
मुरूम ता. १९, ता. २२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील आनंदाचा सण म्हणजे गणेश उत्सव, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सवा वर ही याचा परिणाम झाला आहे.
येणारे गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी दि.१८ रोजी मुरूम पोलिस स्टेशनच्या वतीने नगर परिषद सभागृहात पोलीस स्टेशनचे सपोनि यशवंत बारवकर यांनी मुरूम शहरातील गणेश मंडळाच्या पदादीधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.यावर्षी गणेश उत्सव साजरे करताना शासनाचे सर्व नियमाचे पालन करण्याचे सांगण्यात आले, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, मास्क यासह कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घेवयाची काळजी बद्दल बैठकीत चर्चा करण्यात आले व तसेच सकाळी व संध्याकाळी आरती व भक्तीपर गीते वाजवण्यासाठी हाय कोर्टाने दिलेल्या नियमानुसार ध्वनी प्रदर्शनास परवानगी देण्यात आली व तसेच गणेश आगमन व विसर्जन मिरवणूकी साठी परवानगी नाही व जनजागृतीसाठी देखावे आणि सामाजिक अंतराचा नियम पाळून रक्तदान शिबिरे घेण्यास परवानगी राहील.
या बैठकीस मुरूम शहरातील किसान गणेश मंडळ, नवशक्ती गणेश मंडळ,हनुमान गणेश मंडळ, गांधी चौक गणेश मंडळ, सिद्धरामेश्वर गणेश मंडळ, शास्त्री नगर गणेश मंडळ,संभाजी नगर गणेश मंडळ,यशवंत नगर गणेश मंडळ इत्यादी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते व तसेच बैठकीस सपो उपनिरीक्षक एस एस बिरादार, मुरूम नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक देशपांडे, नगर सेवक अजित चौधरी, राम डोंगरे यासह आदी उपस्थित होते.
Leave A Comment