पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त केसरजवळगा ग्रामस्थांकडून सपत्नीक सत्कार
मुरुमः गावातून मिळालेल्या संस्काराच्या बळावरच तबल्ल ३४ पोलिस दलात सेवा केल्यानंतर पोलिस निरीक्षक पदावरुन यशस्वीपणे मंचर ता.आंबेगाव जि.पुणे येथून सेवानिवृत्त झालो.गावक-यांनी केलेला सन्मान माझ्यासाठी पाठीवर कौतुकाची थाप आहे असे मत पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी व्यक्त केले. उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे जडीबवलिंगेश्वर मठात रविवारी ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून सपत्नीक पुर्ण आहेर देऊन सुधाकर कोरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात यावेळी ते बोलत होते.तत्पुर्वी विरंतेश्वर महास्वामी,विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन श्रीमंत भुरे,सरपंच बलभीम पटवारी,मल्लिनाथ बदोले,संजय पाटील यांच्या हस्ते पोलिस दांम्पत्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच मनिषा गावडे गावडेवाडी, वैशाली पोहेकर ,नागापूर ,संजय पोहेकर ता.आंबेगाव जि.पुणे, उपसरपंच गुरबस भुरे, बाबासाहेब डांगे,शब्बीर ईनामदार, मल्लिनाथ स्वामी,श्रीशैल घोडके ,पोहेकॉ.मल्लिनाथ बंदिछोडे(वळसंग),माजी सरपंच विष्णूपंत पाटील,शेळके प्रशालेचे अध्यक्ष श्रीशैल सैदानरु वागदरी,राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अय्युब इनामदार ,प्रभाकर हुलगणे, अझरोध्दीन इनामदार , काशिनाथ क्षिरसागर , अभिजीत घाळे,ग्रामसेवक रतनसिंग चव्हाण ,योगेश कोडलंगरे ,राघवेंद्र पाटील, कपिलेश्वर स्वामी आदी उपस्थित होते.सुधाकर कोरे यांची प्राथमिक शिक्षण केसरजवळगा तर माध्यमिक शिक्षण सोलापूर येथील दयानंद महाविद्यालय येथे झाले वयाच्या २५ व्या वर्षी नागपूर येथे पोलिस दलात शिपाई म्हणुन भरती झाले यानंतर नौकरी करीत एमपीएससीची परीक्षा देऊन नाशिक येथून पोलिस उपनिरीक्षक पदाची निवड झाली पहिली पोष्टींग मुंबई येथील जुहू येथे झाली यानंतर कांदीवली, येथे सेवा केल्यानंतर सोलापूर जिल्हयातील वैराग पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणुन रुजू झाले.यानंतर पुणे ग्रामीण पोलिस दलात वाहतुक पोलिस निरीक्षक म्हणुन काम पाहिले त्यांचे काम पाहून पुणे ग्रामीणचे पोलिस अधिकक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील मंचर पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतला.त्यांना येथे केवळ आठ महिने काम करण्याची संधी मिळाली या काळात त्यांनी धडाकेबाज काम करीत कमी वेळेतच समाजात लोकप्रिय झाले.त्यांनी बालकांसाठी पोलिस ठाण्यात बालस्नेही केंद्रही सुरु केले.त्यांच्या कार्याचे पोलिसअधिक्षकासह गृहमंत्री वळसे पाटील यांनीही कौतुक केले.त्यांना मुंबई ,पुणे येथे केलेल्या कार्यामुळे त्यांना विविध सामाजिक संस्था व पोलिस दलातर्फे जवळपास दोनशे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ३१ जुलै रोजी मंचर पोलीस ठाण्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा आंबेगाव मंचर येथे चार ठिकाणी सत्कार करुन गौरव करण्यात आला. शांत , शिस्तबद्ध , आणि धडाकेबाज अधिकारी म्हणुन त्यांची ओळख या भागात झाली.यावेळी मनिषा गावडे,अय्युब इनामदार,वैशाली पोहेकर,सुधाकर कोरे यांची भाषणे झाली. प्रास्तविक रमेश भुरे यांनी तर सुत्रसंचलन संजय पाटील यांनी केले. यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक व पुणे जिल्हयातील मंचर येथील नागरीकही उपस्थित होते.
Leave A Comment