Basav Pratishthan News: प्रतिभा निकेतन सेमी इंग्रजीचा निकाल शंभर टक्के तर विद्यालयाचा ९७.२३ टक्के

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

मुरुम, ता.२९ (बातमीदार) : येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातून प्रतिक पाटील याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याला ९९.६० टक्के गुण मिळाले. द्वितीय क्रमांक सोहम अंबर ९८.४० टक्के तर तृतीय क्रमांक कुमारी शितल नाटेकर हीला ९८ टक्के मिळाले. प्रशालेतून विशेष प्राविण्य ९८, प्रथम श्रेणी ८४, द्वितीय श्रेणी ५४ तर उत्तीर्ण ६ असे परीक्षेत बसलेले विद्यार्थी २५३ होते. प्रशालेचा निकाल ९७.२३ टक्के लागला तर सेमी इंग्रजीचा १०० टक्के निकाल लागला आहे.

त्यांच्या या यशाबद्ल माजी मंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रविण गायकवाड, उपमुख्याध्यापक धनराज पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुधीर अंबर, माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे, पर्यवेक्षक सुभाष फुलसुरे, सहशिक्षक उल्हास घुरघुरे, तात्यासाहेब शिंदे, विवेकानंद परसाळगे, राधाकृष्ण कोंडारे, चंद्रामाप्पा कंटे, इरफान मुजावर, महानंदा रोडगे, मंगल शिंदे, मनिषा कंटेकूरे, शाहीन तांबोळी आदिंनी त्यांचे विशेष कौतुक करुन प्रशालेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment