ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुरूम शहरात प्रा. नितीन बानूगडे पाटील यांची जाहीर सभा संपन्न

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुरूम शहरात प्रा. नितीन बानूगडे पाटील यांची जाहीर सभा संपन्न

मुरुम, ता. २४ (प्रतिनिधी) : उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक महायुतीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार ओमराजे उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार (ता. २३) रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते प्रा. बानूगडे पाटील यांची जाहीर सभा पार पडली. या प्रचार सभेत उमेदवार ओमराजे निंबाळकर, बाबा पाटील, आश्लेष मोरे, जिल्हा बँकेचे संचालक प्रा. डॉ. संजय कांबळे, संजय चालुक्य, बसवराज वरनाळे, रजाक अत्तार, बाबुराव शहापुरे, संजय पवार, सुधाकर पाटील, अँड. सयाजी शिंदे, अविनाश रेणके, शितल चव्हाण, महावीर कोराळे, सुधाकर पाटील, विजय वाघमारे, डी. के. माने, रणधीर पवार, दीपक जवळगे आदींची उपस्थित होते. यावेळी नितीन बानूगडे पाटील म्हणाले की, सध्याची लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. विद्यमान खासदार हे सामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी दिवसरात्र एक करून लोकांच्या अडी-अडचणी सोडविल्या. ते नेहमीच रेंजमध्ये असणारे, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे खासदार आहेत. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या एकूण धोरण व कार्याचा इतिवृत्तांत त्यांनी आपल्या भाषणांमधून बोलून दाखला. सध्या देशातील विविध क्षेत्रातील अवस्था पाहता खऱ्या अर्थाने लोकशाही धोक्यात आलेली असून हुकूमशाहीकडे वाटचाल होत असल्याचे चित्र दिसत आहे.महागाई, बेरोजगारी, नोकरभरती, शिक्षण, कृषी, उद्योग आधी क्षेत्रात अनेक समस्या भेडसावत आहेत. आत्मनिर्भर भारत, अच्छे दिन, स्मार्ट सिटीचे काय झाले असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. देशाचे भवितव्य व धोरण ठरविणारी ही निवडणूक असल्याने पक्षांतर करणाऱ्या गद्दारांना जागा दाखवू या. लोकशाही समृद्ध करणारी, संविधान वाचविणारी, मतदानाचा अर्थ आणि नितीमूल्ये जोपासण्यासाठी मतदार बंधू-भगिनींनी अधिक जागरूक राहून आपला खासदार ओमराजे यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्यावे, असे आवाहन शेवटी त्यांनी केले. यावेळी संजय कांबळे, संजय चालुक्य, अविनाश रेणके, सयाजी शिंदे, सुधाकर पाटील आदींची भाषणे झाली. या सभेचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक अजित चौधरी यांनी केले. या सभेकरिता शहर व परिसरातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील अण्णाभाऊ साठे चौकात आयोजित ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ बानगुडे पाटील बोलताना ओमराजे निंबाळकर, बाबा पाटील, संजय कांबळे, बाबुराव शहापुरे, आश्लेष मोरे, संजय पवार, बसवराज वरनाळे,अजित चौधरी आदी.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment