मुरूम शहरात बंदला विरोध, व्यापाऱ्यांनी दिले नगर परिषद, पोलीस स्टेशनला निवेदन… दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

मुरूम शहरात बंदला विरोध, व्यापाऱ्यांनी दिले नगर परिषद, पोलीस स्टेशनला निवेदन…
दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी

मुरूम, ता.०७, राज्यात कोरोनाचे वाढते प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थपना बंद ठेवण्याचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.

दि. ०५ रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश पारित करून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद करण्याचे निर्देश दिले.

त्या अनुषंगाने मुरूम शहरात त्याची नगर परिषद,पोलीस प्रशासनाच्या वतीने अंमलबजावणी सुरुवात झाली.

मात्र शहरातील व्यापारी वर्गानी मात्र शासनावर नाराजी दर्शवत, शासनाने घेतलेलं निंर्णय माघार घ्यावे अशी विनंती करत नगर परिषदेला व्यापारी महासंघ, मुरूमच्या वतीने निवेदन देण्यात आले, आदीच एक वर्षापासून लॉकडाऊन मुळे जगणे मुश्किल झाले आहे आता कुठेतरी आर्थिक घडी सुधारत असताना परत एकदा कडक निर्बंध घालून अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थपणा बंद केल्याने व्यापारी वर्गाचा विरोध दिसून आला.

दि.०७ रोजी मुरूम शहरातील व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशन आणि नगर परिषदेला याबाबत निवेदन देण्यात आले. गेल्या एक वर्षांपासून लॉकडाऊन मुळे अनेक समस्या अडचणी निर्माण झाले आहेत आता परत बंदचे निर्णय त्यामुळे बँकेचे कर्ज त्यांचा व्याज रक्कम कसे फेडायचे? दुकान भाडे,वीज बिल, कर्मचारी वेतन कसे द्यायचे? असे प्रश्न ही निवेदनात विचारण्यात आले आहेत. तरी शासनाने निवेदनावर विचार करून सर्व दुकाने उघडण्यास परवनगी द्यावे अशी विनंतीही करण्यात आले आहे.

मुरूम पोलीस स्टेशन येथे सहायक पोलिस निरीक्षक यशवंत बारवकर यांनी तर नगर परिषदेत कार्यालयीन अधीक्षक देशपांडे यांनी निवेदन स्वीकारले यावेळी मोठ्या प्रमाणत व्यापारी वर्ग उपस्थित होते.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment