हाथरस प्रकरण व काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्कीच्या निषेधार्थ मुरूम शहरात काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा
लोकप्रतिनिधीना धक्काबुक्की, लोकशाहीची हत्या-शरण पाटील
मुरूम,ता.२ (प्रतिनिधी) : येथील शहर काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांना धक्काबुक्कीच्या निषेधार्थ शहरातील शिवाजी चौक येथे शुक्रवारी (ता.२) रोजी सायंकाळच्या सुमारास योगी यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आले, महात्मा बसवेश्वर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत मुरूम शहर काँग्रेसच्या वतीने विविध घोषणा देत निषेध मोर्चा काढण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध व्यक्त करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेस जोडे मारून केंद्र सरकारच्या व योगी यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आले, मुरूम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बारवकर, उपनिरीक्षक शिवदर्शन बिरादार यांना निवेदन देण्यात आले. हाथरस (उत्तरप्रदेश) येथील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की करून अटक केली. याच्या निषेधार्थ मुरुम शहरात काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आले.
हाथरस व लोकप्रतिनिधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झालेलं धक्काबुक्की हे लोकशाहीची हत्या असल्याचे मत यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील, योगेश राठोड, शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, आयुब मासुलदार, सालार कोतवाल, शंभुलिंग पाटील, रशिद शेख, सिध्दलिंग स्वामी, सहदेव गायकवाड, सुरेश शेळके, इब्राहिम नदाफ, बबनराव बनसोडे, गौस शेख, किरण गायकवाड, देवराज संगुळगे, दादा बिराजदार, राजू मुल्ला, नाना बेंडकाळे, सुरज राजपूत, प्रशांत मुरूमकर, समर्थ गोडबोले, दिलीप गुंडगोळे, शिवपुत्र सोलापूरे, महेश लोणी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave A Comment