डिग्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रफीक तांबोळी यांनी घेतली दखल
डीग्गी ता. ०८, गेली अनेक वर्षापासून डिग्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उद्घाटणाच्या प्रतिक्षेत होते कर्नाटक सिमेवर महाराष्ट्रातील शेवटचे गाव कोणताही आजार झाला तर डिग्गी व परिसरातील सर्वच गावातील नागरीकांना उमरगा येथे उपचारासाठी जावे लागत असे प्रा रविद्रजी गायकवाड उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले डिग्गी येथील सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते नागरीक यांच्या प्रयत्नाने अखेर डिग्गी येथील प्राथमिक अरोग्य केंद्र चालु झालेया अरोग्य केंद्रास अपुर्या वैद्यकीय सुविधा असल्याने लहान मुलांचे ढोस कुत्रा चावल्याचे ढोस नसल्याने व औषधे ठेवण्यासाठी विविध सामुग्री नसल्याने तेथील रुग्णांना परत उमरगा मुळज येणेगुर या ठिकाणी यावे लागत असल्याने शिवसेनेचे नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिद्धाराम हत्तरगे यांना येथील नागरीकांनी अनेक विषयावर प्रश्न उपस्थित करुण चर्चा केली ,घोडके या बालकास कुत्रा चावल्याने डिग्गी येथे लस उपलब्ध नाही म्हणून येणेगुर किंवा उस्मानाबाद येथे उपचारासाठी त्यांना जावे लागणार होते सिद्धाराम हत्तरगे यांनी मी येणेगुरलाच राहत असल्याने मला फोन केला व समस्या विषयी माहिती दिली येणेगूर येथील डॉक्टर जळकोटे युवा नेते दिपक हिप्परगे याच्या सहकार्यातुन घोडके यांना सहकार्य मिळाले डिग्गी येथून रुग्णांना उपचारासाठी उमरगा येणेगुर मुळज उस्मानाबाद या ठिकाणी जावे लागत असुन त्यांची होणारी गैरसोय थांबवावी यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य मा श्री रफिक तांबोळी याच्याशी चर्चा केली तांबोळी यांनी सदरील बाबत चौकशी करुण जिल्हा अरोग्य अधिकारी मा श्री डॉ वडगावे यांना तात्काळ फोन करुण समस्या सांगितल्या सध्या कोरोणा या आजारामुळे उमरगा येथील रुग्णालय कोवीड या रुग्णाकरीता राखीव असल्याने व डिग्गी येथील आरोग्य केंद्रात कोणतीही लस उपलब्ध व साम्रुग्री नसल्याने तात्काळ आपण आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध करुण द्याव्यात अशी विनंती करताच जिल्ल्हा अधिकारी डॉ वडगावे यांनी त्यांना तात्काळ आश्वासन दिले आज दि ८ सप्टेबर रोजी डिग्गी येथील आरोग्य केंद्रास सर्व प्रकारचे लस व मशनरी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पोहंच केले या त्यांच्या सेवेमुळे डिग्गी परिसरातील सर्वच जनतेच्या अरोग्यासाठी लाभदायी ठरणार आहे. रफीक तांबोळी जिल्हा परिषद सदस्य व जिवनगे ताई जि प सदस्य यांच्या प्रयत्नातुन डिग्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रश्नांची सोडवणुक झाल्याने नागरिकांतून आभार व्यक्त होत आहे.
Leave A Comment