मुरूम शहरात रामनवमी निमित्त भव्यदिव्य शोभायात्रा संपन्न… सोळा फूट उंचीची प्रभू श्री रामाची आकर्षक मूर्ती ठरले केंद्र बिंदू…

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

मुरूम शहरात रामनवमी निमित्त भव्यदिव्य शोभायात्रा संपन्न…

सोळा फूट उंचीची प्रभू श्री रामाची आकर्षक मूर्ती ठरले केंद्र बिंदू…

मुरूम ता.२१, येथील श्री राम भक्तांच्या वतीने रामनेमीचे औचित्य साधून दि.२० वार शनिवार रोजी मुरूम शहरातील श्रीराम चौकापासून प्रभू श्रीरामाच्या १६ फुटी मूर्तीचे भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. श्री राम चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,महात्मा बसवेश्वर चौक,साठे चौक,अशोक चौक मार्गे शोभायात्रा शहरातील श्री हनुमान मंदिरा पर्यंत वाजत,गाजत फटकड्याच्या आतिषबाजी,जय श्रीराम च्या घोषणा देत मिरवणूक सोहळा उत्साही वातावरणात पार पडला,ठिक ठिकाणी प्रभू श्री रामाचे पूजन व शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.श्री हनुमान मंदिरात महाआरती नंतर शोभायात्रेचे समारोप करण्यात आले. वरून पावसाची सरी चालू होत्या आणि या पावसातही असंख्य राम भक्तांनी शोभायात्रेत सहभाग नोंदवून श्री रामाच्या जयघोषात तल्लीन झाले होते. शोभायात्रा दरम्यान मिरवणुकीतील प्रभू श्री रामाचे सोळा फुटी उंचीचे मूर्ती आकर्षक केंद्र बिंदू ठरले. या शोभायात्रेसाठी अध्यक्ष – दत्तकुमार हुळमजगे,उपाध्यक्ष ओंकार पाटील, सचिव प्रदीप गव्हाणे,सहसचिव – गौरीशंकर बोंगरगे, राजकुमार वाले,मिरवणूक प्रमुख ओमकार कुंभार, शिवा दुर्गे,नेताजी गायकवाड,गोपाळ सोबाजी,सुमित पांढरे,सिद्धलिंग हिरेमठ आदींसह श्री राम भक्तांनी शोभायात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment