उमेदवारांनी आपला आधार क्रमांक तात्काळ अपडेट न केल्यास नोंदणी रद्द

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

उमेदवारांनी आपला आधार क्रमांक तात्काळ अपडेट न केल्यास नोंदणी रद्द

उस्मानाबाद,दि.10(जिमाका):-महाराष्ट्र शासन,कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने नोकरी इच्छुक उमेदवारासाठी एम्पलॉयमेंट नोंदणी कार्ड www.mahaswayam.in हे वेबपोर्टल विकसीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व नोकरी इच्छुक उमेदवार ,कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवार तसेच या वेबपोर्टलवर नोंदणी केलेले सर्व उमेदवार ज्यांनी अद्याप पर्यंत आपले आधार कार्ड एम्पलॉमेंट कार्डशी लिंक केलेले नाही. त्यांनी वेबसाईटवर आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट करुन घ्यावी.यापुर्वीची आधार लिंक करण्याची तारीख 31 ऑगस्ट 2020 पर्यंत होती. त्यास मुदतवाढ देवुन ही मुदत 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.
तरी संबंधित उमेदवारानी आपला आधार क्रमांक व प्रोफाईल तात्काळ अपडेट (अद्यावत) न केल्यास आपली नोंदणी 30 सप्टेंबर 2020 अखेर रद्द होईल.असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता महाराष्ट्र राज्य यांचे वतीने सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद यांनी केले आहे.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment