कदारे कुंटूंबीयांना एकोणीस लाख सात हजार आर्थिक मदतीचा धनादेश शरणजी पाटील यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी शिलादेवी यांना सुपूर्द

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

कदारे कुंटूंबीयांना एकोणीस लाख सात हजार आर्थिक मदतीचा धनादेश शरणजी पाटील यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी शिलादेवी यांना सुपूर्द

मुरुम, ता. उमरगा, ता. १६ (प्रतिनिधी) : येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्यातील कर्मचारी कृषी सहाय्यक कै. बाबाराव कदारे यांचा कोरोना संसर्गामुळे मे महिन्यात (ता.१४) रोजी निधन झाले होते. या कारखान्यामार्फत अशा कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांबद्दल पूर्वी पासूनच सहानुभूतीचे धोरण ठेवून वेळोवेळी सढळ हाताने आर्थिक मदत केली जाते. दरम्यान कारखान्याचे चेअरमन तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी कदारे कुंटूंबियांना आर्थिक मदत देण्याचे तेव्हाच जाहीर केले होते. त्यानुसार जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या हस्ते कदारे यांना मिळणारी रक्कम आणि कारखान्याकडून आर्थिक मदत असे मिळून एकूण रुपये एकोणीस लाख सात हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नी श्रीमती शिलादेवी बाबाराव कदारे यांना सोमवारी (ता.१६) रोजी अचलेर येथे त्यांच्या घरी जावून देण्यात आला. तसेच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून कदारे यांच्या पत्नीला दरमहा २६४६ रुपये फॅमिली पेन्शन व त्यांच्या दोन मुलांना प्रत्येकी दरमहा ६६२ रुपये याप्रमाणे पेन्शन मंजूर करून घेण्यात आली आहे. या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक दत्ता पाटील, सरपंच प्रकाश लोखंडे, माजी सरपंच सुभाष सोलंकर, परमेश्वर पटणे, शिवराज कमलापूरे, शिवपुत्र पाटील, सिध्दाराम पत्रिके, महादेव कदारे, आप्पासाहेब कदारे, अचितानंद कुंभार, कल्लाप्पा गोपने, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी, मुख्य लिपिक शत्रुघ्न देशमुख, वरिष्ठ लिपिक राजू पाटील आदींची उपस्थिती होती. फोटो ओळ : अचलेर, ता. उमरगा येथील कै. बाबाराव कदारे यांच्या पत्नी शिलादेवी कदारे यांना कारखान्यामार्फत १९ लाखाचा धनादेश देताना शरण पाटील, दत्ता पाटील, प्रकाश लोखंडे, सुभाष सोलंकर आदी.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment