श्रद्धास्थान कै आ .भाऊसाहेब बिराजदार यांना पदाधीकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापकीय सचिव तथा उमरगा -लोहारा तालुक्याचे माजी आमदार कै . स्व.भाऊसाहेब बिराजदार यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाविद्यालय बलसुर येथे भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश दाजी बिराजदार, बाळासाहेब स्वामी, भीमा स्वामी ,कमलाकर काळे, प्रा .दत्ता इंगळे, प्रताप तपसाळे, आर.डी. माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाऊसाहेबांच्या स्मृतीस सामूहिक श्रद्धांजली वाहुन भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक, भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ बलसुर यांच्या वतीने कर्मचारी ,अधिकारी तसेच राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले .याप्रसंगी अमोल पाटील, खाजा मुजावर, शमशोद्दीन जमादार, रणजीत गायकवाड ,विष्णू भगत ,जगदीश सुरवसे, प्राचार्य मारेकर ,नेताजी कवठे, अजित पाटील ,राजू औरादकर ,राजेंद्र तळीखेडे, दीपक हिप्परगे, पप्पू हिप्परगे, प्रताप महाराज ,व्यंकट बिराजदार, नाना शिंदे, कपिल चव्हाण, बालाजी सगर, गुरुलींग वाकडे , विजय पाटील, ज्ञानेश्वर बिराजदार, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
Leave A Comment