उस्मानाबाद जिल्ह्याचे कुशल नेतृत्व – बापुरावजी काका पाटील साहेब
– देवराज संगुळगे
उस्मानाबाद जिल्ह्याचे कुशल,संयमी,अष्टपैलू गेमचेंजर नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखले जाते असे आदरणीय बापुरावजी काका पाटील साहेब यांचा आज जन्मदिवस..!
त्यानिमित्त दोन शब्द……..
गेल्या पंचविस वर्षापेक्षा अधिक काळापासून सामाजिक विधायक कार्यात अग्रेसर आहेत.देशात अनेक महिन्यापासून कोविड १९ चे संकट उदभवले असताना सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देण्याचे कार्य आदरणीय काकांनी केले आहे.
कोरोना सारख्या महामारीच्या काळात हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांची संवेदना लक्षात घेऊन त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांना कर्तव्य समजून अन्न धान्याचे किट वाटप करण्यात महत्वाची भूमिका निभावली.
महामरीच्या रोगावर मात करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले.मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना व विविध संस्थांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पुढाकार घेतला.
सर्वसामान्य जनतेबद्दल प्रेम माणुसकीचा जिव्हाळा आपुलकीची संवेदना यांच्या ठायी असल्यामुळे त्यांच्याकडे तितक्याच आपुलकीने नागरिक कामे घेऊन येत असतात.येणाऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्या पूर्णत्वास नेहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.मुरूम शहराचे अनेक गोष्टीने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नावलौकिक आहे.आदरणीय बापुरावजी काका पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असतात.जिल्ह्यात नावाजलेल्या या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते.
गेल्या दोन तीन वर्षांपासून बाजार थंडावला असताना त्याला उर्जित अवस्थेकडे नेहण्याचा प्रयत्न केले आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून आडत कमिशन तीन वरून दोन टक्के करण्याचा निर्णय घेतला.यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.बाजार समितीचा कारभार पारदर्शक असावा ,शेतकरी आडत दुकानदारांची गैरसोय होऊ नये म्हणून सातत्याने लक्ष देत असतात.
उमरगा लोहारा तालुक्यासह जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांच्या कडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते.राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्ष वाढीसाठी व पक्षात सक्रिय राहून जनतेची समस्या सोडवणाऱ्या सक्षम युवक युवतींना संधी देतील अशी अपेक्षा आहे.
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या सर्व इच्छा,आकांक्षा उंचच उंच भरारी घेऊ दे, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊदेत,मनात आमच्या फक्त एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे..!
आदरणीय काकासाहेब आपणास वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा…
Leave A Comment