किसान ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर, महिलांनीही केले रक्तदान..

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

किसान ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त सामाजिक उपक्रम

रक्तदान शिबिर, महिलांनीही केले रक्तदान..

मुरूम ता.०६, येथील किसान चौकातील किसान ब्रिगेड च्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा निमित्ताने मुरुम शहरातील किसान चौक येथे शिवस्वराज्य दिन भगवा ध्वजरोहन करुन, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आले, मुरुम पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप साहेब ,डॉ. सत्यजित डुकरे सर व माजी सैनिक व्यंकटराव चौधरी यांच्या हस्ते पुजन करून सोहळा साजरा करण्यात आले व तसेच याबरोबरच सामाजिक उपक्रम राबवत रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून त्यात ३२ पुरुष आणि ३ महिला भगिनींचा समावेश आहे त्यांना किसान ब्रिगेडच्या वतीने कुकर तर पुरुषांना हेल्मेट भेट देण्यात आले. किसान ब्रिगेड आयोजित शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त रक्तदान शिबिरात महिलांनीही सहभाग नोंदवून रक्तदान केलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी भीमराव दाजी फुगटे , महादेव टेकाळे शिवाजी जाधव,किसान ब्रिगेड अध्यक्ष भगत माळी , दादा बिराजदार,रवींद्र जाधव , दयानंद ईंगळे ,सुनिल खंडागळे ,गोपाळ ईंगोले ,बाळासाहेब फुगटे ,ओंकार फुगटे ,गोपाळ सोबाजी , गणेश महाराज ,नितिश राजपूत , गणेश डोंगरे, हुसेन नूरसे, लखन सत्रे, किरण सोबाजि ,महेश जाधव, विनोद वाघ , प्रथमेश शेळके , रोहित टेकाळे आदी उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी शुभम फुगटे, रवीं चौधरी, पवन माने , योगेश फुगटे आदित्य जोगी आदिनि सहकार्य करित पुढाकार घेलला.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment