मुरूम ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची व्यवस्था चालू करण्याची समाजसेवक रामलिंग पुराणे यांची मागणी

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

मुरूम ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेडची व्यवस्था चालू करण्याची समाजसेवक रामलिंग पुराणे यांची मागणी

मुरूम ता.३०, मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात २० ते २५ ऑक्सिजन बेड वापरण्यायोग्य तयार आहेत, परंतु मुरूम ग्रामीण रुग्णालयासाठी राखीव असलेले १० जम्बो सिलेंडर पैकी ५ सिलेंडर तुळजापूर रुग्णालयास तर २ जम्बो सिलेंडर उमरगा उपजिल्हा रुग्णालयास पाठवण्यात आले असून शिल्लक तीन सिलेंडर मुरूम येथे आहेत.

मुरूम शहराच्या परिसरातील जवळपास २० ते २५ गाव,तांडा वस्तीतील नागरिक मुरूम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात, सद्या कोरोणाच्या परिस्थितीत मुरूम व परिसरातील नागरिकांना ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यांना उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे पुढील उपचारासाठी पाठवावे लागते, आणि उमरगा येथील रुग्णालयात वैधकीय कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येत असल्याने रुग्णांची हेळसांड होते.

अशी विनंती मागणी बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व तसेच प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे. मुरूम ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेड लवकरात लवकर वापरात आणून रुग्णांचे होणारे हेळसांड थांबवावे, अन्यथा भविष्यात फार मोठी जीवित हानीस सामोरे जावेल.
अर्जाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई कराल. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे, सदरील निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी उस्मानाबाद व उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडेही पाठवले असल्याचे पुराणे यांनी सांगितले.

स्टेटमेंट
मुरूम ग्रामीण रुग्णालयात २० ते २५ ऑक्सिजन बेड वापरण्या साठी तयार आहेत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे, ते अद्याप वापरात नाहीत, तरी त्याचे लवकरात लवकर वापरात आणून ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णाची हेळसांड थांबवावी अन्यथा भविष्यात फार मोठी जीवित हानी नाकारता येणार नाही…

रामलिंग पुराणे
समाजसेवक

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment