मुरूम शहरात वारंवार खंडीत होणाऱ्या पाणीपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी युवासेना कडुन निवेदन.
मुरूम शहरात वारंवार खंडीत होणाऱ्या पाणीपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी युवासेना कडुन निवेदन देताना
मुरूम ता.१५, शहरात मागिल सहा महिन्यात वारंवार पाणीपुरवठा खंडीत होत असुन मागिल सहा महिन्यात पाच ते सहा वेळा पाण्याची मोटार जळाली असे सांगण्यात येत आहे प्रथमदर्शनी असे निदर्शनास येते कि सत्ताधारी पक्षांकडून पाणीपुरवठा अधिकारी यांचेकडुन जाणीवपूर्वक जनतेला ञास दिले जात आहे. तसेच शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो .त्यात बदल करून रोज पाणीपुरवठा करण्यात यावा.
मुरूम शहरातील नागरिकाकडुन नळपट्टी ही वर्षभराची घेतली जाते माञ शहरात पाणीपुरवठा किमान सहा महिनेच होतो. त्यातही मोटार जळाली या कारणाखाली दहा-दहा दिवस पाणी पुरवठा खंडीत करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे,याबाबत जिल्हाधिकारी साहेबांना व मुख्याअधिकार्याना निवेदन देण्यात आले.यावेळी युवासेना तालुकाप्रमुख , नगरसेवक अजित चौधरी ,जगदीश निंबरगे ,भगत माळी ,विशाल मोहीते ,विशाल टेकाळे ,जयसिंह खंडागळे ,महेश हिंडोळे ,सागर खंडागळे व ईतर नागरिक उपस्थित होते.
Leave A Comment