विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे विद्वान बनावं… धम्मचारी धम्मभुषण

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे विद्वान बनावं… धम्मचारी धम्मभुषण

मुरुम, ता. उमरगा, ता. १६ (प्रतिनिधी): शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे, असे डॉ. आंबेडकर म्हणायचे.त्यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखं विद्वान बनावं असं प्रतिपादन धम्मचारी धम्मभुषण यांनी केले. त्रिरत्न बौद्ध महासंघ शाखा मुरुम व धम्म संस्कार केंद्र भीमनगर मुरुम यांच्या वतीने ६६ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोका विजयादशमी दिनानिमित्त बौद्ध धम्म ज्ञान व आपले आदर्श महामानव या विषयांवर परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या विध्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी रविवारी (ता. १६) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी.एस.गायकवाड होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट युवा मंच चे अध्यक्ष सिद्धांत गायकवाड, प्रशांत गायकवाड, भीमशाहिर सुरज गायकवाड यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना धम्मचारी धम्मभुषण म्हणाले की, शिक्षणासंदर्भात बाबासाहेबांनी जे चिंतन केले तेही तितकेच मूलगामी स्वरूपाचे आहे. ज्ञानाअभावी व्यक्ती ‌आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्यक्ती वा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणे होय; अशी बाबासाहेबांची शिक्षणविषयक धारणा होती. शिक्षक हा शालेय असो, महाविद्यालयीन असो की विद्यापीठीय असो त्याचे कर्तृत्त्व उत्तुंग आणि विद्यार्थ्यांना अनुकरणीय वाटले पाहिजे, असे ते शिक्षकांविषयी बोलत.
याप्रसंगी सम्राट युवा मंच चे सिद्धांत गायकवाड यांनी परिक्षेत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे व परीक्षा आयोजित करणाऱ्याचे आयोजकांचे आभार मानले.
या परिक्षेत प्राविण्य मिळविलेले विश्ववेध मुरुमकर, हर्षदा कांबळे, श्रीज्ञा भालेराव, आदित्य गायकवाड, आयुष मुरुमकर, मयुरेश कांबळे, तन्वी भालेराव, तनिष कांबळे, सम्यक सागर, प्रणेश गायकवाड, सम्राट भालेराव, उत्सव गोडबोले, यश फुले, तन्मय भालेराव, हर्षवर्धन गायकवाड, विरा गायकवाड, ऋतुजा बनसोडे, प्रदीप भालेराव यांचा मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन धम्ममित्र अजिंक्य मुरुमकर यांनी केले. तर आभार सुनील भालेराव यांनी मानले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment