अभ्यास मंडळे व्यक्तीमत्व विकासाची केंद्रे…. प्राचार्य डॉ.अशोक सपाटे
मुरूम, ता. उमरगा, ता.२७ (प्रतिनिधी): सध्या देशात विविध क्षेत्रात गुन्हेगारी प्रवृत्ती दवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांनी चांगले विचार कृतीमध्ये आणण्यासाठी नियमित विविध उपक्रमामध्ये सक्रिय राहून स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास साधण्यासाठी अभ्यास मंडळे ही व्यक्तीमत्व विकासाची केंद्रे आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांनी केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्र यांच्यावतीने आयोजित राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी (ता. २७) रोजी उद्घघाटक म्हणून ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत उपस्थिती होती. पालक दादासाहेब काळे, संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. रवि आळंगे उपस्थित होते. पुढे बोलताना सपाटे म्हणाले की, जो स्वतःला ओळखतो तो जगाला ओळखू शकतो. समाजातील वाढत्या समस्या जाणून घेवून त्यासाठी पुढाकार घेवून तरुणांनी चांगल्या गोष्टीकरिता एकत्र आले पाहिजे. आज देशाला चांगल्या विचारांची गरज आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांमध्ये महत्वकांक्षा, बंधुभाव, प्रेम, जिव्हाळा, राष्ट्रीय एकात्मता आदि गोष्टीची आवश्यकता असल्याचे शेवटी ते म्हणाले. डॉ. राजपूत म्हणाले की, अशी अभ्यास मंडळे ही व्यक्ती विकासाची माध्यमे आहेत. या मंडळामध्ये प्रत्येकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. प्रा. सुजाता मुके यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या नूतन अध्यक्ष पदी कुमारी शुंभागी कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीशैल जंगम, सचिव निकिता पाताळे, कोषाध्यक्ष पुजा शिंदे, प्रसिद्धी प्रमुख भीमाशंकर कोष्टी, सदस्या प्रगती कुलकर्णी, ऋतुजा काळे आदींची निवड झाल्याबद्ल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनोज हावळे, योगेश पांचाळ, सोनाली माने, वैष्णवी जोशी, लक्ष्मी चौधरी, वैष्णवी सोलापूरे, अंकिता पाताळे, कांचन रोळे आदिंनी पुढाकार घेतला. यावेळी बी.ए.तृतीय व एम.ए.द्वितीय वर्षाच्या माजी व आजी विद्यार्थ्यांकडून राज्यशास्त्र विभागास काचेचे मोठे कपाट सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार अंबिका पाताळे यांनी मानले.
Leave A Comment