राहुल वाघ यांनी घेतलं, कॉंग्रेसचा झेंडा हाती…
उमरगा तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष पदी राहुल वाघची निवड…
मुरूम ता.११, शिवसेनाप्रमुख हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक राहुल वाघ यांनी शिवसेनेचे झेंडा सोडून काँग्रेसचा झेंडा घेतला हाती…
काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते राहुल डिंगबर वाघ यांचे उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदी निवडीचे पत्र देण्यात आले.
राहुल वाघ यांनी काँग्रेसचे झेंडा हाती घेतला आणि याचे सर्वे सर्वां श्रेय हे जिल्ह्याचे युवानेते शरण बसवराज पाटील यांचे आहे असे मत सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवकांची विकासात्मक धोरणाकडे वाटचाल करत एक वेगळी फळी निर्माण करण्याचा क्रेझ शरण पाटील निर्माण करीत आहेत.
शिवसेना समर्थक राहुल वाघ यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला याचा अर्थ मुरूम शहर, परिसरात काँग्रेसचे विकासात्मक धोरण त्यांनी नक्कीच मान्य केले असेल, तालुक्यातील शिवसेनेचे कामावर नाराजी असल्यानेच यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेणे पसंत केलं असे नागरिकांतून चर्चा आहे.
राहुल वाघ यांच्या निवडी दरम्यान उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष शरण बसवराज पाटील, किरण गायकवाड ,देवराज संगुळगे,विकास शिंदे,विनोद वाघ,महेश शिंदे,हुळमजगे, श्रीहरी शिंदे,राजू मुल्ला,नेताजी गायकवाड आदी उपस्थित होते.
राहुल वाघ यांच्या निवडीनंतर मुरूम शहरातील झुरळे गल्ली येथे नगरसेवक सुरेश शेळके, रायजिंग स्टार व मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले तर समाज माध्यमावरही त्यांचे अभिनंदन व्यक्त करण्यात आले.
Leave A Comment