उमरगा जनता सहकारी बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात साजरी
मुरूम, ता. उमरगा, ता. २७ (प्रतिनिधी) : उमरगा जनता बँकेने सभासद व ठेवीदारांचा विश्वास संपादन करुन २०६ कोटी ठेवी तर २३१ कोटीचे खेळते भाग भांडवल आहे. सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. रिझर्व्ह बँकेचे नियम वरचेवर बदलत असून अनेक निर्बंध लावले जात आहेत. स्पर्धेच्या युगात कसोटीचा काळ आहे. येत्या वर्षभरात बॅकेची सुसज्ज अशी इमारत होईल. रिझर्व्ह बँकेचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन आपल्या बॅंकेने सातत्याने ऑडिट अ वर्ग मिळवला आहे. झपाट्याने प्रगती करत असलेली व तत्पर सेवा देणारी बँक म्हणून आज उमरगा जनता बँकेकडे पाहिले जात असल्याचे मत चेअरमन शरण पाटील यांनी व्यक्त केला. उमरगा जनता सहकारी बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता.२७) रोजी उमरगा येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, बॅंकेचे व्हाईस चेअरमन ॲड. विरसंगप्पा आळंगे, दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे, नानाराव भोसले, अमोल पाटील, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, केशव पवार, विजयकुमार सोनवणे, चंद्रशेखर पवार, ॲड. विश्वनाथ पत्रिके, ॲड. संजय बिराजदार, सर्व संचालक, मुख्याधिकारी अमित भरडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले की, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा बँकेचे चेअरमन बापुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बॅकेने यशस्वी वाटचाल सुरू आहे. सभासदांनी जागृत होऊन वेळेवर कर्जाची परतफेड करणे गरजेचे आहे. येणा-या काळात मराठवाड्यात सर्वोच्च स्थानी घेऊन जायचे आहे. संस्था उभारणे, टिकविणे व वाढविणे गरजेचे आहे. उमरगा जनता बँकेत सभासदांचे भागभांडवल ७ कोटी ३४ लाख, निधी ८ कोटी २२ लाख, २०६ कोटींच्या ठेवी तर सभासदांना १३० कोटीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बॅकेचा ३ कोटी ९८ लाख रुपयाचा ढोबळ नफा, खेळते भाग भांडवल २३१ कोटी, गुंतवणूक ७६ कोटी ८७ लाख रुपये आहे. बँकेच्या ठेवीमध्ये सातत्याने वाढ होत असून हे ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. बँकेने आरबीआयच्या सर्व निकषांचे पालन केले असून बँकेने सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करुन ठेवीचा विक्रम नोंदवला आहे. यावेळी विजय वाघमारे, महालिंग बाबशेट्टी, योगेश राठोड, महेश माशाळकर, यशपाल कांबळे, सर्व शाखाधिकारी, सभासद, ठेवीदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उल्हास घुरघुरे यांनी केले. मुख्याधिकारी अमित भरडे यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला व अहवाल वाचन केले. बॅंकेचे व्हा. चेअरमन ॲड. विरसंगप्पा आळंगे यांनी आभार मानले.
Leave A Comment