बस पडली सकाळी बंद,महिला कर्मचारी संध्याकाळ पर्यंत बसल्या ताटकळत
चिमकुल बाळ घरी वाट पाहतोय आईच…तब्बल १३ तासांनी बाळाची आणि आईची भेट
मुरूम ता.१९, उमरगा बस स्थानकातून दि.१९ वार शनिवार रोजी सकळी ८ वाजता उमरगा-अक्कलकोट गाडीचा प्रवास चालू झाला, मुरूम मार्गे गाडी केसर जवळगा येथे सकाळी ९.३० वाजता पोहचल्यानंतर गाडी बंद पडली, त्यानंतर चालक आणि वाहक यांनी तात्काळ उमरगा डेपो ला गाडी बंद पडल्याची माहिती दिली, गाडीतील पुढे जाणाऱ्या प्रवासी नागरिकांना दुसऱ्या बस मध्ये बसवून पाठवून देण्यात आले त्यानंतर पँपीग करून गाडी मुरूम पर्यंत घेऊन आले, दुपारी १.३० वाजता गाडी मुरूम बस स्थानकात पोहचली व परत बंद पडली, सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी ०६ वाजेपर्यंत ना मेकॅनिक आला आणि नाही कर्मचाऱ्यांना रिलीफ भेटलं, त्या गाडीतील महिला वाहक कर्मचारीनी आपल्या लहान दीड वर्षाच्या चिमुकलीला घरात सोडून सकाळी ०६ वाजता कामाला निघालेली कर्मचारिस मात्र संध्याकाळ पर्यंत ताटकळत बसावे लागले, कामाचे वेळ संपूनही महिला कर्मचारिस सुट्टी मिळाली नाही, संध्याकाळी ०६ वाजता मेकॅनिक येऊन अवघ्या ५ मिनिटात गाडी दुरुस्त करून निघून गेला, ०६ वाजता गाडी मुरूम ते उमरगा प्रवसास निघाली, उमरगा बस डेपोतील डेपो मॅनेजर यांचा एस टी डेपो, एस टी च्या समस्या, कर्मचारी वरील समस्यां कडे लक्ष नसल्याचे स्पष्ट दिसून येते.याबाबत विचारणा करण्यासाठी उमरगा डेपो मॅनेजर कुलकर्णी यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही. महामंडळाचे एस टी अधिकाऱ्यावर अंकुश नसल्याने व त्याच बरोबर एकीकडे मुख्यमंत्री महाराष्ट्र एस टी महामंडळास नवीन बसच्या घोषणा करतात अद्याप मात्र नवीन बस तर मिळालेच नाही पण आहे त्या बस ना सुद्धा वेळेत सुविधा मिळत नसल्याचे दिसून येते, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे एस टी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सोसावे लागते त्यातल्या त्यात किमान महिला कर्मचाऱ्यांची तरी तात्काळ दखल घ्यावी अशी चर्चा मुरूम बस स्थानकात नागरिकांतून रंगल्या होत्या. सकाळी ०६ वाजता कामावर निघालेल्या महिला कर्मचारी आणि चिमकुल्या बाळाचा तब्बल १३ तासांनी उमरगा बस स्थानकात भेट झाली. यावेळी रिपोर्टिंग करण्यासाठी एकही अधिकारी उपलब्ध नसल्याचे बस महिला कर्मचारी शीतल सचिन कांबळे यांनी सांगितले, महिला कर्मचारी पतीने डेपो मॅनेजर कुलकर्णी जाणून बुजून त्रास देत असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
Leave A Comment