होमगार्ड समस्या सोडवण्यासाठी नेमलेले समिती बसव प्रतिष्ठाणला मान्य नाही…!

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

होमगार्ड समस्या सोडवण्यासाठी नेमलेले समिती बसव प्रतिष्ठाणला मान्य नाही…!

महासमादेशक यांनी समितीवर नेमले आपल्याच मर्जीतले अधिकारी..!

महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या बाबत बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी देशाचे मा. राष्ट्रपती यांना दि.१७ जुलै रोजी व केंद्रीय गृहमंत्रलयात दि.०९ जुलै रोजी तक्रार दाखल केली होती.
काय आहेत समस्या- शासनाकडून निधी येऊनही मानधन वेळेत न देणे, काहीही कारण दाखवून अनेक होमगार्डना अपात्र ठरवण्यात आले आहेत, यासह गेल्या 4-5 वर्षा पासून महासमादेशक यांनी होमगार्ड साठी कोणते चांगले निर्णय घेतले. आपत्तीजनक परिस्थितीत ही ठराविक होमगार्डनाच मिळाले काम, महिला होमगार्डना काम नाही असे अनेक समस्या…
राष्ट्रपती सचिवालयातून सदरील तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांकडे कारवाई साठी पत्र पाठवण्यात आले होते व तसेच केंद्रीय गृह विभागाकडून दि.09 जुलैच्या बसव प्रतिष्ठाणच्या तक्रारीची दखल घेत दि. 22 जुलै रोजी केंद्रीय महासंचालकानी महाराष्ट्र राज्याचे होमगार्ड विभागाला होमगार्ड समस्या अभ्यास व सोडवण्यासाठी पत्र पाठवून त्री सदसिय समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले होते व तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल पाठवण्यास सांगितले होते.
दि.03 सप्टेंबर 2020 रोजी राज्याचे होमगार्ड महासमादेशक संजय पांडे यांनी त्री सदसिय समितीसाठी सदानंद वायसे पाटील, पोलीस अधीक्षक तथा वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी (प्र. व.धो.) यांची समिती अध्यक्ष पदी तर राहुल श्रीरामे, अधीक्षक नागरी संरक्षण तथा वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी (चा.व.भा.) यांची समिती सदस्य व वामन ते धकाते, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांची समिती सचिव पदी नेमणूक करण्यात आले असल्याचे आदेश पत्र दि.०३ सप्टेंबर रोजी काढण्यात आले.
सदरील नेमलेली समिती आम्हाला मान्य नाही, मा.राष्ट्रपतीजीना व केंद्रीय गृह विभागास ज्यावेळी आम्ही तक्रारी मांडल्या आहेत त्यात राज्याचा होमगार्ड महासमादेशक वरही तक्रार नमूद असून त्यांनीच ही समिती नेमली आहे आणि त्यात त्यांच्या अधिपत्याखाली काम करत असलेल्या त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या त्यांच्याच मर्जीतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यामुळे राज्यातील होमगार्ड समस्या सुटणार नाहीत आणि अहवालही योग्य जाणार नाही त्यामुळे महासमादेशक यांनी नेमलेली समिती आम्हाला मान्य नाही, कृपया आपण आमच्या पत्राचा सहानुभूतीपूर्वक विचार करून उच्चस्तरीय म्हणजेच ज्यांची तक्रार आहे ते महासंचालक दर्जाचे IPS आहेत. त्यांची चौकशी जर करायची असेल तर यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून चौकशी करावी व महाराष्ट्र राज्यातील होमगार्डच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून द्यावे ही विनंती. दि. 03 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासमादेशक यांनी समिती नेमलेली आदेश तात्काळ रद्द करून नव्याने समिती नेमावे असे पत्र बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष तथा समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी राज्याचे मुख्य सचिव यांना व माहितीसत्व मा.राष्ट्रपतीजी,केंद्रीय गृह विभाग, मुख्यमंत्री, गृहमंत्री,उपमुख्यमंत्री,गृहराज्यमंत्री व तसेच महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दि.०३ रोजी ई-मेल द्वारे पाठवण्यात आले असल्याचे समाजसेवक रामलिंग पुराणे यांनी सांगितले.

_________________________
महासमादेशक यांनी गेल्या 5 वर्षा पासून होमगार्डच्या भल्याचे कार्य केले नाहीत, समस्या वर समस्या निर्माण करून राज्यातील होमगार्डवर उपासमारीची वेळ आणली आहे आणि त्याला पूर्णपणे महासमादेशक जबाबदार आहेत, होमगार्ड साठी कोणते चांगले निर्णय महासमादेशक यांनी घेतले आहेत याची उच्चस्तरिय चौकशी होणे गरजेचे आहे. आपल्याच मर्जीतले अधिकाऱ्यांची समिती वर नेमणूक करून शासनाची दिशाभूल करत असून त्यांनी नेमलेली समिती आम्हाला मान्य नाही….
– रामलिंग पुराणे, संस्थापक अध्यक्ष बसव प्रतिष्ठाण तथा समाजसेवक

 

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment