गणेशाचे आगमनाची मुरूमकरात उत्साह, बाजरपेठेत आज रौनक
मुरूम ता. २२ अवघ्या काही तासांवर गणेशाची स्थापणा होईल, मुरूम शहरातील मुख्य बाजार पेठा काल पेक्षा आज भरभरून दिसत आहे, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ज्या ज्या ठिकाणी गणेशोत्सव साठी लागणारे साहित्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी नागरिकांनी आज खरेदी साठी गर्दी केली होती.
नागरिकांमध्ये गणेशाचे आगमनाची उत्साह आहे च शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करणेही गरजेचे आहे.
मुरूम शहरातील मुख्य गणेश मंडळ त्यात अशोक चौक गणेश मंडळ,किसान चौक गणेश मंडळ,नवशक्ती गणेश मंडळ, हनुमान चौक गणेश मंडळ, शास्त्री नगर मंडळ सह आदी मंडळाकडून गणेशाचे आगमनाचे जय्यत तयारी सुरू आहे.
यावर्षी कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळाकडून सामाजिक उपक्रम व जनजागृती पर देखावे साजरे करत असल्याचे यावेळी मंडळांनी सांगितले.
आज शनिवार जनता कर्फ्यू मध्ये गणेश उत्सवा मुळे शिथिलता भेटल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.गणेश उत्सवा साठी लागणारे साहित्य व्यतिरिक्त इतर चालू असलेल्या आस्थापणा वर नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई ही चालू आहे. व तसेच गर्दीवर नियंत्रण ही ठेवण्यात येत आहे.
Leave A Comment