शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचा पालन करत शाळा सुरू, विद्यार्थी संख्या जेमतेम उपस्थिती
मुरूम ता.२४, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले साडेसात महिन्यापासून बंद असलेले शाळा अखेर दि.२३ वार सोमवार पासून स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारी वर उगडण्यात आले.
शासनाचे मार्गदर्शक सुचनेचे पालन करत शिक्षक व प्राध्यापक यांचे रॅपिड टेस्ट करून अखेर मुरूम शहरातील शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय दि.२३ रोजी सुरू करण्यात आले. पालकांची समत्ती असेल तरच शाळा येण्यास परवानगी देण्यात यावे व पालकांना विध्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी मज्जाव करू नये असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पारित केले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विध्यार्थ्यांचे न भरून निघणारे शिक्षणाचे नुकसान झाले आहे, अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध असलेल्या विध्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत पण ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत त्यांचाही प्रश्न ऐरणीवर होता. त्यात दि.२३ पासून शाळा तर सुरू झाले परंतु शाळेत मात्र विध्यार्थ्यांची जेमतेमच गर्दी दिसून आले आणि तेही फक्त स्थानिक विद्यार्थीच हजर असल्याचे समजते, मुरूम शहरात परिसरातून अनेक वाडा, वस्ती तांड्या हुन विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात पण अद्याप त्यांची शाळेत उपस्थिती झाली नसल्याचेही शाळेच्या मुख्यध्यापकांनी सांगितले. शासनाचे सर्व नियमाचे पालन करत सॅनिटायझर, मास्क व सामाजिक अंतर राखत शाळा जरी सुरू असले तरी अद्याप पालकात मात्र भीतीचे वातावरण कायम आहे.
मुरूम शहरातील प्रतिभा निकेतन विद्यालय व प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असलेल्या इयत्ता ९ व १० चे वर्ग एक दिवसाआड सुरू करण्यात आले आहेत व तसेच ११ व १२ चे वर्ग पण एक दिवसाआड सुरू ठेवण्यात आले आहेत एक दिवस ९ तर दुसऱ्या दिवशी १० असे वर्ग चालू असून शासनाच्या नियमानुसार गणित,विज्ञान,इंग्रजी विषय वर्गात तर इतर विषय ऑनलाईन माध्यमातून शिकवले जात असल्याची माहिती प्राचार्य पी पी गायकवाड यांनी दिली. याचबरोबर मुरूम शहरातील जि.प. प्रशाला शाळेत विद्यार्थी संख्या दि.२३ पेक्षा दि.२४ रोजी वाढले असल्याची माहिती तेथिल मुख्यध्यापक मंमाळे यांनी दिली, जि.प. कन्या प्रशाला येथे हजर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तर फारच कमी आहे, परिसरातील विद्यार्थी उपस्थित न झाल्यामुळे शाळेत संख्या कमी असल्याची माहिती मुख्यध्यापक गाडेकर यांनी दिली.
प्रतिभा निकेतन विद्यालयात इयत्ता ९ वी वर्गातील २६० विद्यार्थी पैकी ५५ तर १० वी वर्गातील २५७ पैकी ४० विध्यार्थी हजर होते, उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वीचे ३४० पैकी १०५ तर १२ वीचे ३०६ पैकी ५२ विद्यार्थी हजर होते. जिल्हा परिषद प्रशाला इयत्ता ९ वीचे वर्गात ७१ पैकी १२ तर १० वीच्या वर्गात ७३ पैकी १८ विद्यार्थी उपस्थित होते. जि.प. कन्या प्रशाला येथे ०९ वीचे ४६ पैकी ५ तर १० चे ३९ पैकी १० विद्यार्थी उपस्थित होते.
कोरोनाचे पार्श्वभूमीवर शिक्षक व प्राध्यापकांचे रॅपिड टेस्ट घेण्यात आले होते त्यात मुरूम शहरातील सर्व कर्मचारीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत मात्र विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली नाही, अनेक पालकांनी अद्याप समत्ती दिली नाही व त्यात कोरोनाचे दुसरी लाट वेगाने पसरत आहे, आणि शाळेची जबाबदारी मात्र शासनाने स्थानिक प्रशासनावर सोपवून शाळा सुरू करण्यास परवानगी जरी दिली असली तरी अद्याप कोरोनाचे सावट मात्र कायम आहे.
Leave A Comment