जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी SAMADHAN Grievances APP कार्यान्वित हेाणार -जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी
SAMADHAN Grievances APP कार्यान्वित हेाणार -जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे


उस्मानाबाद,दि.05(जिमाका):- जिल्हयातील शासकीय कार्यालयांचे काम अधिक पारदर्शकपणे व्हावे तसेच नागरिकांची कामे वेळेवर आणि सुरळीत व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून समाधान या मोबाईल ॲपची लवकरच उस्मानाबादकरांना भेट मिळणार आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयात समाधान मोबाईल ॲप विषयी आयेाजित अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणा प्रसंगी डॉ. ओम्बासे बोलत होते.
यावेळी प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे,जिल्हा पुरवठा स्वाती शेंडे सहित इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते-तसेच जिल्हयातील सर्व तालुक्यांमधील कार्यालया प्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे या बैठकीत सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे म्हणाले,उस्मानाबाद जिल्हयातील नागरिकांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाकडून समाधान (SAMADHAN Grievances APP) कार्यान्वित करण्यात आले आहे. या ॲपव्दारे नागरिकांनी सादर केलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी समाधान ॲप हाताळणीबाबत आजचे हे जिल्हा स्तरीय प्रशक्षिण आयोजित करण्यात आले आहे.तेंव्हा या ॲपबाबत सर्वांनी साक्षर होऊन नागरिकांना वेळेत सेवा देण्याचे प्रयत्न करावे असे आवाहनही डॉ.ओम्बासे यांनी यावेळी केले.
नागरिकांच्या तक्रार निराकरण करण्यासाठी समाधान ॲप अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.सामान्य नागरिक ते अधिकारी सर्वांना उपयोगी आणि वापरण्यास सुलभ अशी या ॲपची मांडणी (User interface) आपलेही ॲप Google Playstore वर लवकरच

उपलब्ध करुन दिली जाईल या ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी आपली तक्रार ऑनलाईन नोंदवल्यानंतर याबाबतचा नोटिफिकेशन प्राप्त होईल तसेच तक्रारीवर झालेल्या निराकरण किंवा कार्यवाहीबाबतची माहिती मॅसेजव्दारे मोबाईलवर कळविण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले
*****

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment