जिल्हा परिषद प्रशाला, मुरूम तालुका उमरगा येथे वृक्षारोपण…

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

जिल्हा परिषद प्रशाला, मुरूम तालुका उमरगा येथे वृक्षारोपण…

 

मुरूम ता.०५, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त व महाराष्ट्र राज्याचे माजी मुखमंत्री कै.वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत सन 2021 अंतर्गत जि प प्रशाला मुरूम तालुका उमरगा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर मंमाळे, केंद्रप्रमुख गिरी सर, केंद्रीय मुख्याध्यापक विजयकुमार कोळी सर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व्यंकट चौधरी, प्राथमिक शाळा कंटेकुरचे मुख्याध्यापक कमलाकर मोटे, प्राथमिक शाळा,आचार्यतांडाचे मुख्याध्यापक बलभीम पुजारी, प्राथमिक शाळा पाटीलतांडाचे मुख्याध्यापक शिवलाल राजपूत, चर्मकार संघटनेचे अध्यक्ष राजू धनशेट्टी,सामाजिक कार्यकर्ते अरविंद बेंडकाळे, सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक गुरु शेळके, प्रशालेचे पालक व अनेक विद्यार्थी उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक संतोष कडगंचे, विजयकुमार देशमाने, कल्लाप्पा पाटील, सत्येश्‍वर भिसे ,प्रमिला तुपेरे,निर्मला यादव, रेखा निंबाळकर, राजू पवार,नागनाथ कामशेट्टी, निर्मला परीट आदी उपस्थित होते. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी दहा कोटी प्रमाणे पन्नास कोटी वृक्ष लागवड व संवर्धनाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रशालेतील प्रत्येक शिक्षक व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करावे कोरोणा सदृश्य परिस्थिती मध्ये ऑक्सिजनची कमतरता आपणा सर्वांना जाणवली. यामुळे वृक्षलागवड करणे, संवर्धन व संरक्षण, संगोपन करणे, ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मुख्याध्यापक मधुकर मंमाळे यांनी सांगितले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment