कोराळ येथे लोककल्याण प्रतिष्ठान कडून हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.
लोककल्याण चे अध्यक्ष विक्रम दासमे यांच्या संकल्पनेतून
उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संक्रांती निमित्त हळदी – कुंकू व तिळगुळ वाटप कार्यक्रम गुरूवार ( ता.१४ ) घेण्यात आला. हितगुज करूया मिळुनी सार्याजनी,हळदी कुंकू लेऊया हक्काच्या अंगनी या उक्तीप्रमाणे तसेच हलवा बनवताना जसे तीळ आणि गूळ एकत्र होऊन जातात तसेच दोन स्त्रियांनी एकरूप होऊन नेहमी रहावे. हा संदेश लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला जातो.
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचा वारसा देण्यासाठी हळदी कुंकू करण्यात आले. हा सौभाग्याचा सण जुन्या नव्या भेटीमुळे विचारांचा उजाळा मिळाला तसेच “चूल आणि मूल” व कमावत्या स्त्रियांना कामाच्या व्यापातून बाजूला होऊन एकत्र येऊन महिलांचा रोजचा ताणतणाव विसरून वर्षभर त्यांच्यात गोड संबंध टिकून ठेवण्यासाठी हा लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यक्रम ठेवुन त्यांच्यात मनसोक्त आनंद निर्माण होऊन एकमेकींच्या सुखदुःखाची देवाणघेवाण करण्यासाठी व एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला. दासमे यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात सौभाग्याचे लेणे असलेले हळदी-कुंकू एकमेकींना लावुन लोककल्याण संस्थेच्या महिला अध्यक्ष सौ.छाया अशोकराव दासमे, सौ.शितल रवि दासमे,सौ.पद्मावती किरण दासमे, यांनी महीलांना संक्रांतीचा वाण तसेच तिळगुळ दिला. या कार्यक्रमासाठी गावातील महिला व बचत गटातील महिलांना निमंत्रण करण्यात आले होते. या निमत्रणांचा मान ठेवून २५० ते ३०० महिलांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला व आनंद व्यक्त केला.
Leave A Comment