अनोळखी वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, मुरूम शहरात शोककळा पसरली

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

अनोळखी वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

मुरूम शहरात शोककळा पसरली

मुरुम, ता. उमरगा (प्रतिनिधी) : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर उमरगा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या जकेकूरवाडी पाटीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अनोळखी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोघांचाही मृत्यू झाला. रविवारी (ता. १९) रोजी रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. दोघेही मृत मुरुम (ता. उमरगा) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी आहेत.
या बाबतची अधिक माहिती अशी की, मुरुम बाजार समितीचे प्रभारी सचिव अण्णाराव कल्याणी कुंभार (वय ५६ वर्ष) महादेव नगर, मुरुम व सुग्रीव श्रीरंग पाटील (वय ५७ वर्ष) यशवंत नगर, मुरूम हे दोघे उमरगा येथून काम आटोपून मुरुमकडे दुचाकीवरून जात असताना अनोळखी वाहनाने धडक दिली. त्यात अण्णाराव कुंभार यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच उमरगा-चौरस्ता येथे गेली बारा वर्षे अपघातग्रस्ताच्या मदतीला मोफत असलेली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणिज धामची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. गंभीर जखमी असलेले सुग्रीव पाटील यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे मुरूम शहर व परिसरात शोककळा पसरली.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment