शहरात पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह एकूण ७१ रुग्ण, जिल्ह्यात पहिली कोव्हीड पॉजिटिव्ह महिलेची शस्त्रक्रिया यशस्वी..

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

0
(0)

शहरात पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह एकूण ७१ रुग्ण मुरुम, ता.१६ (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील मुरुम शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरात एकूण रुग्णांची संख्या ७१ झाली आहे. रविवारी (ता.१६) रोजी २ रॅपिड अँटीजन चाचणीत दोघे पॉझिटिव्ह आले. यापैकी एकजण यशवंत नगर तर दुसरा संभाजी नगर मधील आहे. सध्या विलीनीकरण कक्षामध्ये १८ आणि १० जणावर घरी उपचार तर एका रुग्णाला पुढील उपचारासाठी उमरगा येथे रेफर करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सत्यजित डुकरे यांनी सांगितले.

जिल्हयात पहिली कोविड पॉझिटिव्ह महिलेची शस्त्रक्रिया यशस्वी आई आणि बाळाची तब्येत उत्तम
मुरूम येथील एक महिला  कोरोना पॉजीटिव्ह आली ती गरोदर असून नऊ महिने पूर्ण झाले होते. त्या महिलेचे पुर्वी एक सिजर झाले होते. तिला उस्मानाबादला आणून कोविड जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यावेळी पण तिचे सीजर करणे गरजेचे होते पण तिच्या रक्ताचा अहवाल खुपच अडचणीचा होता. तीला आयसीयुमध्ये ठेवणे गरजेचे होते. पॉझिटिव्ह असल्याने महिला रुग्णालयात पण इतर रुग्ण असल्याने तीचे सीजर करणे शक्य नव्हते तर जिल्हा रुग्णालय कोविड सेंटर असल्याने इतर रुग्णांना तपासणे देखील बंद करण्यात आले असताना. सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची प्रसूती आयुर्वेदिक महाविद्यालयात करता येईल पण तिथे ही आयसीयुची व्यवस्था नाही. अशा कठीण प्रसंगी सहयाद्री हॉस्पिटलचे डॉ.दापके यांनी आमच्या दवाखान्यातील सर्व सुविधा पुरवू असे आवाहन केल्यानंतर तेथील स्त्री रोगतज्ञा डॉ.गवळी मॅडम यांनी खरा पुढाकार घेऊन सीजर करण्याची तयारी दर्शवली, भूल विभागाचे डॉ. आदटराव,बालरोग तज्ञ डॉ. मुकुंद माने, डॉ.दापके आदिंनी नवजात बाळाची काळजी घेतली. डॉ.कैलास गीलबीले यांनी सदर स्त्रीचे ऑपरेशन होईपर्यंत उपस्थित राहून मदत केली. श्री.कांबळे, देशपांडे, बंडगर आदिंनी सहकार्य केले. गोंडस बाळ दोन किलो सातशे ग्रॅम वजनाचे भरले. सध्या आई व बाळ दोघेही सुखरूप आहेत. या शस्त्रक्रियेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मोलाचे सहकार्य मिळाले तसेच सहयाद्री हॉस्पिटलचे पण खुपच सहकार्य लाभल्याची भावना रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave A Comment