उमरगा नगर परिषदेच्या वतीने पेपर विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई, पेपर व मासिकेही घेऊन गेले.
उमरगा पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
उमरगा नगर परिषदेच्या वतीने पेपर विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई, पेपर व मासिकेही घेऊन गेले. उमरगा पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
उमरगा ता.२१, रविवारी जनता कर्फु च्या अनुषंगाने उमरगा नगर परिषदेच्या वतीने येथील पेपर विक्रते वर दंडात्मक कारवाई करत पेपर व मासिके घेऊन गेले.
ही माहिती मिळताच उमरगा शहरातील पत्रकार पेपर विक्रेतेच्या मदतीला धावून आले व जिल्हाधिकारी यांना या बाबत निवेदन ही यावेळी देण्यात आले.
जिल्ह्यातील पेपर विक्रेत्यांना मास्क वापरून गर्दी न करता पेपर विक्रीस परवानगी असताना रविवारी दि.२१ रोजी बस स्थानका समोरील पेपर विक्री स्टॉलवर महिला तोंडाला मास्क बांधून पेपर विक्री करीत होती. उमरगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर हे स्वतः सकाळी आठ ते सव्वा आठच्या सुमारास पालिकेच्या शासकीय गाडीतून आले व स्टॉलवरील सर्वच पेपरचे गट्टे व मासिके गाडीत टाकून घेऊन गेले. सदरील पेपर विक्री करणारी महिला साहेब, मी तर मास्क घातला आहे, स्टॉल समोर मुळीच गर्दी नाही. पेपर विक्रीला परवानगी आहे म्हणून मी पेपर विक्री करत आहे आपण बंद करायला सांगितले तर पेपर विक्री बंद करून घरी जाते पण पेपर घेऊन जाऊ नका आमची ही रोजी रोटी आहे. अशी विनवणी करीत होती. परंतु मुख्याधिकारी यांनी त्यांचे न ऐकता पेपर व मासिके घेऊन गेले.
त्यानंतर सदर महिलेने ही बाब त्यांचे पती तानाजी घोडके यांना सांगितली. तेंव्हा तानाजी घोडके यांनी नगरपालिकेत जाऊन पेपर व मासिकाची मागणी केली परंतु पाच हजार रुपयांची दंडाची पावती करण्याची सूचना देण्यात आली. याबाबत काही पत्रकार बांधवानी जिल्हास्तरावर तर काहींनी मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला व पेपर विक्री करण्याऱ्या महिलेने मास्क वापरले होते त्यामुळे दंड न करण्याची विनंती केली, परंतु पालिकेने ५०० रुपयाची दंडाची पावती केली आहे.
पेपर वाटप करणेस व पेपर विक्री करणेस परवानगी द्यावी व सदरील पावती रद्द करून त्यांचे पैसे परत देणेबाबत आदेश व्हावेत असे निवेदनात म्हंटले आहेत. उपविभागीय अधिकारी,उमरगा व तसेच मुख्याधिकारी नगर परिषद उमरगा यांना या निवेदनाची प्रत देण्यात आले आहे.
निवेदनावर पत्रकार अविनाश काळे,बालाजी वडजे,अंबादास जाधव,समीर सुतके,गो.ल. कांबळे, अमोल पाटील, युसुफ मुल्ला, महादेव पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Leave A Comment