येणेगुर येथील वैद्यकिय सह्यता कक्षास आर्सेनिक अल्बम गोळ्याची उमेश दिवटे यांच्या कडून मदत

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

येणेगुर येथील वैद्यकिय सह्यता कक्षास आर्सेनिक अल्बम गोळ्याची उमेश दिवटे यांच्या कडून मदत

येणेगुर ता.०९, येथील उमेश तम्मण्णा दिवटे हे मुंबई दिघा येथे साई मित्र मंडळाची स्थापना करुण सामाजिक शैक्षणीक उपक्रम सातत्याने राबविलेली आहेत कोरोना या काळात गरजू कुटुबियाना अनेक प्रकारची मदत केली. शिवसेनेचे नेते तथा नवी मुंबई महानगर पालिका विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांचे ते कट्टर समर्थक आहेत, प्रा रवींद्र गायकवाड आमदार ज्ञानराज चौगुले युवा नेते किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने उमरगा लोहारा तालुक्यात उमेश दिवटे यांनी यापुर्वीही काम केलेले आहे. येणेगुर येथे गावी येताना गावातील व परिसरातील नागरीकांना कोरोणा या आजारावर प्रतिकारात्मक शक्ती वाढविणाऱ्या अर्सेनिक अल्बम १००० कुटूंबासाठी गोळ्या वाटपास आणल्या असून या गोळ्या कोरोणा वैद्यकीय सह्यता कक्षास देण्यात आल्या, यावेळी येणेगुर महोत्सवाचे संयोजक प्रदीप मदने युवा नेते सतोष दादा कलशेट्टी उपस्थित होते. या गोळ्या सर्वासाठी कक्षात उपलब्ध असतील व प्राथामिक आरोग्य केंद्र येणेगुर या ठिकाणीही गोळ्या देण्यात येणार असल्याचे प्रदीप मदने यांनी सांगीतले.सध्या कोरोणा वैद्यकीय कक्षामध्ये आर्सेनिक अल्बम गोळ्या टेम्प्रेचर व पल्स तपासणी काम चालु आहे, सर्वांनीच या तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment