मुरूम ता. ९, उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शरण बसवराज पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून देशातील बेरोजगारी बाबत ऑनलाईन आंदोलन छेडले.
दि.९ रोजी शरण बसवराज पाटील या फेसबुक पेज वरून “केंद्र सरकारकडून युवकांना रोजगाराची मागणी” या विषयावर त्यांनी आज युवकाशी संवाद साधला व ऑनलाईन आंदोलन छेडले.
गेल्या 5-6 वर्षा पासून भारतात बेरोजगारीची संख्या वाढत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हणाले व तसेच भाजपच्या काळातच युवकांना न्याय मिळत नाही त्यांच्या हाताला काम नाही त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असल्याची खंत त्यांनी आज ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केला, त्यांच्या या उपक्रमास युवकांनी प्रतिसाद दिला.
Leave A Comment