सर्व धर्म समभाव, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे ब्रिद वाक्य डोळ्यासमोर ठेवून जगतज्योती महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची एक अखिल भारतीय सामाजिक संघटनेची “बसव प्रतिष्ठाण” च्या रूपाने स्थापना केली आहे. ई.स. ११३४-११९६ म्हणजेच १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी केलेले कार्य डोळ्यासमोर ठेऊन जाती पंतीत भेदभाव न करणे,विधवेचा पुनर्विवाह,आंतरजातीय विवाह,अनुभव मंटप सारखा मोटा विचारमंच (संसद) स्थापना करणाऱ्या जगाच्या पहिल्या थोर विचारवंत क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे विचार परत एकदा सामाजिक बांधिलिकी साठी मांडण्याचा प्रयत्न या “बसव प्रतिष्ठाण” मार्फत करण्यात येणार आहे आणि करत आहोत. बाबासाहेबांनी म्हंटल्या प्रमाणे मानवता हे एकच धर्म आहे, स्त्री व पुरुष हे दोनच जात आहेत. हेच संदेश डोळ्यासमोर ठेऊन ही संघटना उभी केली आहे.