भक्तिमय वातावरणात ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा संपन्न.. हजारो सदभक्तांची उपस्थितीत ग्राम प्रदक्षिणा

Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

0
(0)

भक्तिमय वातावरणात ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा संपन्न..

हजारो सदभक्तांची उपस्थितीत ग्राम प्रदक्षिणा

मुरूम ता.१३, येथील ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त दि.१२ रोजी रात्री १२ वाजून १० मिनिटाला अग्नी पेठवण्यात आले, सकाळी अतिशय भक्तिमय वातावरणात विधिवत पूजन संपन्न झाल्यानंतर पालखी पुरंत आणि सदभक्तांच्या उपस्थित अग्नी प्रवेश झाला. प्रारंभी हनुमान चौकातून पालखी ग्राम प्रदक्षिणा साठी सुरुवात झाले. अतिशय भक्तिमय वतातवरणात पुरंत यांचे पारंपारिक खेळी, विविध भजने मंडळे, विविध समाजाचे नंदी कोलचा उत्स्फूर्तपणे सहभाग होता.

ग्रामदैवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा काशी उजैन,श्रीशैल पिठाचे संचालक तथा उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१३ वार बुधवार रोजी जल्लोषात संपन्न झाले, सकाळी दहा वाजता श्री. कपिलसिद्ध मल्लिकार्जुन पालखी अग्नी प्रवेश करून नगर प्रदक्षिणास सुरुवात झाली. अष्टगी,लोणी, भोसगे परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे त्यांच्या घरून वाजत गाजत कुंभ कळस घेऊन आले व त्याच बरोबर लोणी परिवाराच्या वतीने महात्मा बसवेश्वर व त्यांच्या पत्नी गंगाबिका यांचा जिवंत देखावा कुंभ दरम्यान सादर केला.

प्रारंभी अग्नी प्रवेशा नंतर हुनुमान चौकात श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यांच्या पालकीचे भक्तिमय वातावरणात व पुरंत खेळून पूजन संपन्न झाले त्यानंतर पालखी नगर प्रदक्षिणा साठी निघाली, यादरम्यान शहरातील शेकडो महिलांनी डोक्यावर कुंभ कळस घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला होता,

त्याच बरोबर मुरूम शहरातील मातंग,परीट, सुतार समाजाचे मानाचे दिंडीचाही उत्साहात सहभाग झाला होता, शहरातील विविध भजनी मंडळानेही पालखीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला,

शहरातील सोनार गल्ली, अशोक चौक, भाजी मंडई, डोंगरे गल्ली,टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक,गांधी चौक या पालखी मार्गावर भाविक भक्तांनी रांगोळीने व त्याच बरोबर पालखी पूजन करून व पालखी वर पुष्पवृष्टी करून ठिकठिकाणी स्वागत केले,

डोंगरे परिवाराच्या वतीने भक्तासाठी दुधाचा प्रसादाचे वाटप केले, गांधी चौकात दुर्गे परिवाराच्या वतीने चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, मंदिर समितीच्या वतीने प्रदक्षिणा दरम्यान सदभक्तांना अल्पउपहार, पाण्याची सोय करण्यात आली होती.

टाळ, मृदंग, ढोल-ताश्यानी भक्तिमय वातावरणात श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन जयघोषाणे मुरूम नगरीतुन पालखी सोहळा हजारो नागरिकांच्या सहभागाने संपन्न झाले. सुभाष चौकातून पालखी गांधी चौकाकडे मार्गस्थ झाले यावेळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापुराव पाटील यांनी श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन पालखीचे दर्शन घेतले. कपिलेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने श्री.कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त दरवर्षी पुराणाचे आयोजन केले जाते, यावर्षी उमराणी मठाचे वेदमूर्ती मुरुगेंद्र मठ शास्त्री यांच्या मधुर वाणीने व त्याच बरोबर संगीत गायक वीरपक्षय्या, तबला वादक बसवराज यांच्या भक्ती गीताने चालू असलेल्या श्री बसव पुराणाचे पालखी प्रदक्षिणा नंतर सांगता झाले. अतिशय भक्तिमय वातावरणात श्री.कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रा उत्साहात संपन्न झाले, यात्रा व संपूर्ण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंदिर समिती अध्यक्ष प्रशांत पाटील मित्र मंडळाच्य वतीने परिश्रम घेतले.पालखी प्रदक्षिणा नंतर हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

How useful was this post?

Click on a star to rate it!


Spread the love
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave A Comment